Mumbai: Medics walk past a new swab testing cabin at Podar hospital in Worli during a nationwide lockdown in the wake of coronavirus pandemic, in Mumbai, Sunday, April 19, 2020. (PTI Photo/Kunal Patil)(PTI19-04-2020_000179B)
मुंबई 20 एप्रिल: राज्यात टेस्टिंगचं प्रमाण वाढल्याने रुग्णांच्या संख्येतही वाढ झाली आहे. गेल्या 12 तासांमध्ये आज 466 नवीन रुग्ण सापडले. तर 9 लोकांचा मृत्यू झाला. त्यामुळे कोरनाबाधितांची संख्या 4,666 एवढी झाली आहे. तर मृत्यूचा आकडा 232वर गेला आहे. आज 65 रुग्ण बरे झालेत. तर त्यामुळे आत्तापर्यंत कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 572 झाली आहे. काही रुग्णांचा अभ्यास केल्यानंतर त्यातले 81 टक्के रुग्ण हे लक्षणविरहित आढळल्याची माहिती समोर आली आहे. यातल्या 2336 रुग्णांचा अभ्यास करण्यात आला. त्यातल्या 1890 रुग्णांमध्ये हे कोरोनाचे लक्षणच आढळून आलेले नाहीत. 392 म्हणजे 17 टक्के लोकांना लक्षणे होती. तर 53 रुग्णांनी गंभीर स्वरुपाची लक्षणे होती. त्यांना अतिदक्षता विभागात भरती करण्यात आलं आहे अशी माहिती दिली जात आहे. धारावीत 30 नवे रुग्ण आढळले त्यामुळे धारावीतल्या एकूण रुग्णांची संख्या 168वर गेली आहे. सगळ्यात जास्त रुग्ण 5 हे शास्त्रीनगर मध्ये तर आठ रुग्णांचा पत्ता शोधून काढण्याचे काम सुरू आहे. आज एकही नव्या मृत्यूची नोंद नाही. धारावीत आत्तापर्यंत 11मृत्यू झाले आहेत. Coronavirus विरोधात लढा : भारताने अशी आखली रणनीती, विकसित देशही झाले फेल दरम्यान, पुण्यात ससूनमध्ये गेल्या 48 तासात एकही मृत्यूची नोंद नाही. पुण्यातील वाढता कोरोना मृत्यूदर आटोक्यात आणण्यात ससून प्रशासनाला अखेर यश आले. ससूनमध्ये गेल्या महिन्याभरात 41 रूग्ण दगावलेत, पण गेल्या 48 तासात एकही मृत्यू नाही. मृत्यूदर वाढल्याने आणि इतर तक्रारीवरून ससूनचे डीन डॉ. अजय चंदनवाले यांची उचलबांगडी करण्यात आली होती. ससूनचा चार्ज आता उपअधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे यांच्याकडे देण्यात आला आहे. ZP अधिकाऱ्याकडून नियमांची पायमल्ली, संचारबंदीत पुण्यात गेला बायकोला भेटायला! पुणे शहरात कोरोनाबाधित रूग्णाची संख्या 612 वर पोहोचली आहे. सोमवारी (20 एप्रिल) दिवसभरात पुण्यात 23 नव्या रुग्णाची नोंद झाली आहे. एकट्या वेल्हा तालुक्यात 7 नवे रूग्ण आढळले आहे. तर पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाबाधित रूग्णांची संख्या 57 झाली. या पार्श्वभूमीवर पुण्यात 100 टक्के कर्फ्यू लागू करण्यात आली आहे. 27 एप्रिलपर्यंत हा नवा आदेश लागू असणार आहे, अशी माहिती पुणे शहराचे सहपोलिस आयुक्त रवींद्र शिसवे यांनी दिली आहे.