JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / ...त्या बातम्या मानहानीकरक कशा असू शकतात? हायकोर्टाने शिल्पा शेट्टीला बजावले

...त्या बातम्या मानहानीकरक कशा असू शकतात? हायकोर्टाने शिल्पा शेट्टीला बजावले

‘तुम्ही एक सेलिब्रिटी आहात लोकांना तुमच्याबद्दल वाचायला आवडतं, म्हणून लिहिलं जातंय. तसंच तुमच्याशी संबंधीत काही घडतंय’

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 30 जुलै : पोर्न व्हिडीओ प्रकरणी राज कुंद्राला (Raj Kundra Case) अटक करण्यात आली आहे. प्रसारमाध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांमुळे व्यथित होऊन अभिनेत्री शिल्पा शेट्टीने (Shilpa Shetty) मुंबई उच्च न्यायालयात (mumbai high court) धाव घेतली होती. पण, मुंबई पोलिसांच्या रिपोर्टवर आधारीत बातम्या या मानहानीकरक कशा असू शकतात? असा प्रश्न मुंबई उच्च न्यायालयानं शिल्पा शेट्टीला विचारला. राज कुंद्रा यांच्या अटकेनंतर प्रसार माध्यमात येत असलेले शिल्पा शेट्टीचे नाव यामुळे आपली बदनामी  (Defamation Case) होते, असा दावा शिल्पा शेट्टीने न्यायालयात केला होता. यावरुन बराच वेळ न्यायालयात युक्तीवाद देखील झाला. मात्र, तुम्ही एक सेलिब्रिटी आहात लोकांना तुमच्याबद्दल वाचायला आवडतं, म्हणून लिहिलं जातंय. तसंच तुमच्याशी संबंधीत काही घडतंय आणि त्याबद्दल जर लिहिले गेले असेल तर त्यांवर तुम्ही बंधने आणण्याची मागणी कशी काय करू शकता? असा उलट प्रश्नच न्यायालयाने शिल्पा शेट्टीला विचारला. एकतर्फी प्रेमाच्या वेडानं घेतला जीव; विवाहित तरुणीची आत्महत्या ‘आता तुमच्या बद्दल काही चांगलं लिहीयाचं की काहीच लिहू नका, हे आम्हा कसं सांगू शकतो’, अशा शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती गौतम पटेल यांनी स्पष्ट केलं. तसंच, या याचिकेत प्रतिवादी करण्यात आलेल्या सर्वांना 18 ऑगस्टपर्यंत तर शिल्पा शेट्टीला 26 ऑगस्टपर्यंत उत्तर दाखल करण्याचे निर्देश देत याचिकेची सुनावणी 20 सप्टेंबरपर्यंत तहकूब केली.

वाढत्या R-Value मुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती वाढली; काय आहे हा R फॅक्टर?

‘कोणी एका प्रसार माध्यामाने दाखवेल्या बातमीचा आधार घेवून तुम्ही सरसकट सर्वांवर बंधने आणण्याची मागणी करत आहात, हे धक्कादायक आहे असा सरसकट निर्देश देता येत नाही. आपला लोकशाही देश आहे इथे अभिव्यक्त स्वातंत्र्य आहे प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे. प्रसार माध्यमांना देखील पूर्ण स्वातंत्र्य आहे. पण पत्रकारीता ही विश्वासहार्य आणि जबाबदारीने केली पाहिजे हे ही तितकंच खरं आहे त्यामुळे न्यायालय असे निर्देश देवू शकत नाही’, असं सुनावणी दरम्यान न्यायमूर्ती गौतम पटेल यांन स्पष्ट केलं. यावर, ‘आम्ही कोणावर बंदी घालण्याची मागणी करत नाही, मात्र वार्तांकन करताना वैयक्तिक पातळीवर टिका टिप्पणी नसावी असा युक्तीवाद शिल्पा शेट्टीच्या वतीने करण्यात आला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या