JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / येत्या 3 दिवसांत मुंबईसह पुण्यात वरुणराजा बरसणार; आज 15 जिल्ह्यांना IMD कडून इशारा

येत्या 3 दिवसांत मुंबईसह पुण्यात वरुणराजा बरसणार; आज 15 जिल्ह्यांना IMD कडून इशारा

Weather Forecast: आज राज्यात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज एकूण 15 जिल्ह्यांना हवामान खात्याने अलर्ट (IMD Alerts) जारी केला आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 20 सप्टेंबर: गेल्या आठवड्यात सलग चार ते पाच दिवस मान्सूनने ब्रेक घेतल्यानंतर आता राज्यात पुन्हा पावसासाठी पोषक हवामानाची स्थिती निर्माण झाली आहे. सध्या बंगालच्या उपसागरात चक्रीय वाऱ्याची स्थिती निर्माण झाल्याने राज्यात पावसाचा जोर (Rain in maharashtra) वाढत आहे. येत्या काही दिवसांत बंगालच्या उपसागरातील चक्रीय वाऱ्याची स्थिती तीव्र झाल्यास राज्यात आणखी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. आजही राज्यात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज एकूण 15 जिल्ह्यांना हवामान खात्याने अलर्ट (IMD Alerts) जारी केला आहे. आज मुंबईसह, पुणे, ठाणे, पालघर, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, नाशिक, धुळे, नंदुरबार, उस्मानाबाद, लातूर आणि नांदेड या 15 जिल्ह्यांना मुंबई प्रादेशिक हवामान खात्याकडून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. संबंधित जिल्ह्यात पुढील काही तासांत वेगावान वाऱ्याच्या साथीने जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची हजेरी लागण्याची शक्यता आहे. पुढील तीन दिवस राज्यात कमी अधिक फरकाने हीच स्थिती कायम राहणार आहे. हेही वाचा- अरे बापरे! 73 वर्षीय आजोबांना पाच वेळा कोरोना लस, सहाव्या लसीचीही मिळाली तारीख मुंबईसह पुण्याला झोडपणार पाऊस गेल्या आठवड्यात विश्रांती घेतल्यानंतर मुंबईसह पुणे परिसरात मान्सूनसाठी पोषक हवामान तयार झालं आहे. पुढील तीन दिवस मुंबई आणि पुण्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. तिन्ही दिवस पुण्याला हवामान खात्याने येलो अलर्ट जारी केला आहे. आज सकाळपासूनच मुंबईसह पुणे जिल्ह्यात ढगाळ हवामानाची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे पुढील काही तासांत याठिकाणी धुव्वाधार पावसाची शक्यता आहे. हेही वाचा- VIDEO: धाडस दाखवत वडिलांनी बिबट्याच्या जबड्यातून मुलाला सोडवलं; मुंबईतील घटना IMDने रविवारी दिलेल्या माहितीनुसार, सध्या पूर्व राजस्थान आणि लगतच्या मध्य प्रदेशाच्या काही भागात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं आहे. तसेच बंगालचा उपसागर आणि उत्तर ओडिशा-पश्चिम बंगाल-बांगलादेश किनारपट्टीवर चक्रीय वाऱ्याची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे पुढील 4-5 दिवसांत गुजरात, राजस्थान आणि मध्य प्रदेशात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच आज पूर्व राजस्थानात तुरळक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या