JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / राज्यभरातील कडक लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणणार? आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिलं स्पष्टीकरण

राज्यभरातील कडक लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणणार? आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिलं स्पष्टीकरण

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope Reaction On Lockdown) यांनी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत याबाबत भाष्य केलं आहे.

जाहिरात

आरोग्य विभागाच्या गट क ची परीक्षा 24 ऑक्टोबरला तर गट ड ची परीक्षा 31 ऑक्टोबरला होणार आहे, अ

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 7 एप्रिल: कोरोना (Coronavirus) साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने कडक निर्बंध लादले आहेत. मात्र या निर्बंधांमुळे अर्थचक्राला धक्का बसल्याने राज्यभरातून अनेक घटक सरकारच्या या निर्णयाला विरोध करत आहेत. या पार्श्वभूमीवर सरकार लागू केलेल्या निर्बंधांमध्ये काही शिथिलता आणणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope Reaction On Lockdown) यांनी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत याबाबत भाष्य केलं आहे. ‘दुकाने बंद आहेत हे मान्य आहे, पण जीव वाचवण्याला प्राधान्य देण्यात येत आहे. निर्बंधांमध्ये काही प्रमाणात शिथिलता देता येईल का यावर मंत्रिमंडळात विचार करू. निर्बंध कडक केले आहेत, लॉकडाऊन केलेलं नाही,’ असं स्पष्टीकरण राजेश टोपे यांनी दिलं आहे. तसंच या कठीण काळात कुणीही राजकारण करू नये, भाजपनेही सहकार्य करावं, अशी विनंती टोपे यांनी केली आहे. हेही वाचा - मोठी बातमी: व्यापाऱ्यांच्या विरोधानंतर दुकानांबाबतच्या निर्बंधांवर राज्य सरकारने केला खुलासा राजेश टोपे यांच्या पत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे: - जर 40 लाख लस उपलब्ध झाल्या नाहीत तर तीन दिवसात लसीकरण बंद होईल - आजाराचा स्ट्रेन बदलला आहे का अशी शंका आहे. याबाबत केंद्राला कळवलं आहे नमुने दिले आहेत - वय 20 ते 40 या गटाला लस द्या अशी मागणी केंद्र सरकारला केली - महाराष्ट्रात बाराशे मेट्रिक टन ऑक्सिजन तयार होतो तो सर्व आता रुग्णांसाठी ठेवला. - इतर राज्यातून ऑक्सिजनची मागणी केली - खाजगी डॉक्टर यांनी रेमडीसिव्हीरचा वापर केवळ निर्देशानुसार करावा - केवळ बिल वाढावे म्हणून रेमडीसिव्हीर वापरलं जात आहे, त्यावर कारवाई करण्यात येणार - रेमडीसिव्हीर 1100 ते 1400 रुपयांपर्यंतच्या किमतीतच विकावे - हे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या