धनंजय दळवी, प्रतिनिधी मुंबई, 9 फेब्रुवारी : सौदी अरेबियातील मक्का हे जगभरातील पवित्र ठिकाणांपैकी एक आहे. जगभरातील मुस्लीमांची आयुष्यात एकदा तरी हज यात्रा करण्याची इच्छा असते. या यात्रेला तुम्हाला जायचं असेल तर त्यासाठी किती खर्च येतो? हज यात्रेचा कालावधी किती दिवसांचा आहे? यासाठी बुकिंग कुठं करायचं असतं? कोणते कागदपत्र आवश्यक आहेत? या सर्व प्रश्नांची उत्तरं आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. त्याचबरोबर केंद्र सरकारनं तुमच्यासाठी एक गुड न्यूज देखील दिली आहे. त्याबद्दलही आम्ही माहिती सांगणार आहोत. मुंबईतील बखला इंटरनॅशनल ट्रॅव्हल्सचे व्यवस्थापक मोअझ्झं बखला यांनी मागील काही वर्ष हज यात्रा केली आहे. त्याचबरोबर त्यांना इतरांनाही या यात्रेला घेऊन जाण्याचा अनुभव आहे. बखला यांनी या विषयावरील सर्व प्रश्नांना उत्तरं दिली आहेत. काय आहे गुड न्यूज ? या संदर्भात माहिती देताना बखला यांनी सांगितलं की, ‘आम्ही मागच्या 34 वर्षांपासून अनेकांना हज उमरा यात्रा घडवून आणली आहे. यंदा केंद्र सरकारनं मोठा निर्णय घेतलाय. हज धोरण 2023 नुसार यावर्षी सर्वांना विनामुल्य अर्ज करता येणार आहे. यापूर्वी प्रत्येक अर्जासाठी 400 रुपये आकारले जात होते. वृद्ध महिलेचं मोठं मन, आयुष्यभरची कमाई मंदिर निर्मितीसाठी दान, Video नवीन हज धोरणानुसार यावेळी वृद्ध, अपंग आणि महिलांना प्राधान्य दिले जाणार आहे. एवढेच नाही तर 45 वर्षांवरील कोणतीही महिला आता एकट्याने हज प्रवास करण्यासाठी अर्ज करू शकणार आहे. केंद्र सरकारनं यावर्षी केलेल्या करारानुसार यंदा देशभरातून 1 लाख 75 हजार 25 जणांना हज यात्रा करता येणार आहे. यापैकी 80 टक्के हाजी हज कमिटीच्या वतीने यात्रेला जाणार आहेत. तर 20 टक्के हाजी खासगी टूर ऑपरेटरच्या माध्यमातून हज यात्रेला जाऊ शकतील. त्याचबरोबर केंद्र सरकारनं यावर्षी व्हीआयपी कोटाही रद्द केला असून व्हीआयपी नागरिकांनाही सामान्य यात्रेकरुंप्रमाणे प्रवास करावा लागणार आहे.
गेल्या दोन वर्षांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता हज यात्रेवर निर्बंध लादण्यात आले होते. आता या निर्बंधात शिथिलता आणण्यात आली आहे. त्यामळे यंदाच्या यात्रेसाठी सौदीमध्ये मोठ्या प्रमाणात यात्रेकरू येण्याची शक्यता आहे. त्याप्रकारे नियोजन देखील करण्यात येत आहे,’ अशी माहिती बखला यांनी दिली. कधी आणि कसं करणार बुकिंग? हज यात्रेसाठी येत्या काही दिवसांमध्ये अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होईल. ही अर्ज प्रक्रिया पुर्ण झाल्यावर तारीख निश्चित करण्यात येईल. यावर्षी मे महिन्याच्या शेवटी किंवा जून महिन्यात हज यात्रा सुरू होण्याची शक्यता आहे. नाच गाण्यामुळे मशिदीत येण्यासाठी बंदी घातली; तरूण करतोय लाखोंच्या मनावर राज्य कोणती कागदपत्रं हवीत ? हज यात्रेसाठी किमान सहा महिने कालावधीचा वैध पासपोर्ट आवश्यक आहे. त्यामधील दोन पेज रिकामी हवीत. आधार कार्ड, पॅन कार्ड आवश्यक असून यावर्षी कोव्हिड लसीकरणाचे प्रमाणपत्रही सौदी अरेबिया सरकारनं मागितलं आहे. किती कालावधी आणि खर्च? हज कमिटीकडून आयोजित करण्यात आलेली यात्रा ही 40 दिवसांची असते. तर खासगी टूर्सकडून तुम्हाला अनेक ऑप्शन आहेत. यामध्ये 13, 21, 25, 35 आणि 40 दिवसांचे पॅकेज आहेत. या यात्रेसाठी हज कमिटी ऑफ इंडियाकडून किमान 3 लाख 80 हजार ते 4 लाख इतका खर्च येईल. हे सर्व पैसे हप्त्यानं देण्याची सोय आहे. भारतामधून यात्रेसाठी विमानात बसण्यापूर्वी पूर्ण रक्कम भरणे आवश्यक आहे. कुठे कराल बुकिंग? ऑनलाईन बुकिंग : https://hajcommittee.gov.in/ त्याचबरोबर मुंबईसह अनेक महानगरामध्येही हज कमिटीची कार्यालयं आहेत तिथंही या यात्रेसाठी बुकिंग करता येईल.