JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / Girl Friend Murder Case : मित्राच्या मदतीने प्रेयसीला मारलं, पण एका चप्पलने झाला खुनाचा उलगडा

Girl Friend Murder Case : मित्राच्या मदतीने प्रेयसीला मारलं, पण एका चप्पलने झाला खुनाचा उलगडा

पाच दिवसांपूर्वी पनवेल तालुक्यातील धामणी गावाच्या उड्डाण पुलाजवळ एका महिलेचा मृतदेह आढळल्याने मोठी खळबळ उडाली होती.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

प्रमोद पाटील (नवी मुंबई), 22 डिसेंबर : पाच दिवसांपूर्वी पनवेल तालुक्यातील धामणी गावाच्या उड्डाण पुलाजवळ एका महिलेचा मृतदेह आढळल्याने मोठी खळबळ उडाली होती. दरम्यान यावर पनवेल तालुका पोलिसांनी अधिक तपास सुरू केला होता. या महिलेची अज्ञात व्यक्तीने हत्या केली असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी मिळाली. त्यानंतर पनवेल गुन्हे अन्वेषण विभागाने सदर घटनेचा तपास सुरू करत गुन्हेगाराला पकडले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मागच्या 5  दिवसांपूर्वी एका बारमध्ये काम करणाऱ्या महिलेचा खून झाला होता. हा खून पनवेलमधील धामणी गावात झाला होता. दरम्यान पनवेल पोलिसांनी अधिक तपास करत महिलेच्या खुनातील आरोपींचा शोध लावला आहे. यामध्ये एका जीम ट्रेनरने आपल्या मित्राच्या मदतीने त्या महिलेचा खून केल्याची माहिती समोर आली आहे. ती लग्नाचा तगादा लावत असल्याच्या कारणी हे कृत्य केल्याची माहिती मिळाली आहे.

हे ही वाचा :  Kidnapping Case : बापाच्या समोर मुलीला उचलून नेलं, जबरदस्तीने कारमध्ये बसवलं अन्…धक्कादायक Video

संबंधित बातम्या

सदर महिलेच्या पायात सापडलेल्या चपलेवरून दुकानाचा शोध घेत खरेदी वेळी तिच्या सोबत एक व्यक्ती असल्याचे समोर आले, त्यानंतर सदर महिला एका बारमध्ये काम करत होती. तिचे आणि घणसोलीमधील एका व्यायाम शाळेचा ट्रेनर यांचे अनेक वर्षांपासून प्रेम होते.

जाहिरात

सदरची महिला या व्यक्ती सोबत लग्नासाठी तगादा लावत असल्याने त्याने आपल्या मित्रा सोबत गळा दाबून ठार मारून मृतदेह पनवेलमधील धामणी गावाच्या खाली फेकून दिल्याने तपासात निष्पन्न झाले आहे.  

हे ही वाचा :  लग्नाच्या विधीदरम्यान नवरदेवाचं लज्जास्पद कृत्य, ओरडतच नवरीने वरातीला हाकलवून लावलं

यात दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले असून,आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून,आरोपीचे आणखी काही प्रेम प्रकरणे असल्याचे पोलिसांना संशय असल्याने तपास सुरू असल्याचे गुन्हे अन्वेषण विभागाचे उपायुक्त अमित काळे यांनी सांगितले.

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या