JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / Bhandup Hospital Fire Exclusive: ...तर त्या 11 जणांचे प्राण वाचले असते, जीवघेण्या आगीचं कारण आलं समोर

Bhandup Hospital Fire Exclusive: ...तर त्या 11 जणांचे प्राण वाचले असते, जीवघेण्या आगीचं कारण आलं समोर

काही दिवसांपूर्वी मुंबईती भांडुप (Bhandup Hospital Fire) याठिकाणी असणाऱ्या ड्रीम्स मॉलमधील कोव्हिड सेंटरला आग लागली होती. त्या आगीत 11 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी महत्त्वाची Exclusive Update

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 23 एप्रिल: शुक्रवारी पहाटे विरारच्या विजय वल्लभ कोव्हिड हॉस्पिटलमध्ये (Vijay Vallabh Hospital Fire, virar) आग लागल्याची घटना आहे. गेले काही दिवस वारंवार अशा घटना घडत असल्याचे समोर येत आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईतील भांडुप (Bhandup Hospital Fire) याठिकाणी असणाऱ्या ड्रीम्स मॉलमधील कोव्हिड सेंटरला आग लागली होती. त्या आगीत 11 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला होता. सनराइज रुग्णालयात (Sunrise Covid Center Fire) ही आग लागली होती. या आगीच्या घटनेमुळे संपूर्ण मुंबई हादरून गेली होती. दरम्यान ही आग कशामुळे लागली? ही आग लागण्यामागे काय कारणं होती? योग्य खबरदारी घेण्यात आली नव्हती का? या सर्व प्रश्नांची उत्तरं देणारा आगीचा चौकशी अहवाल तयार झाला आहे. सोमवारी आयुक्तांकडे हा अहवाल सोपवण्याात येणार आहे. दरम्यान यामध्ये मॉल आणि रुग्णालय प्रशासनावर ठपका ठेवण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. 25 मार्च रोजी रात्री ही आगीची घटना घडली होती. सूत्रांच्या माहितीनुसार, रुग्णालयाचा बेजबाबदार आणि निष्काळजी वृत्ती यामुळे 11 जणाचा मृत्यू झाल्याचा ठपका या अहवालात ठेवण्यात आला आहे. शिवाय आगीदरम्यान वीज प्रवाह खंडित झाल्यानंतर आयसीयूमधील व्हेंटिलेटर डिझेल जनरेटरवर चालवण्याची पर्यायी व्यवस्था नव्हती, असेही यात नमुद करण्यात आले आहे. (हे वाचा- Virar Fire: ‘माझी बरी होत आलेली आई गेली हो…’, मुलीचा मन हेलावून टाकणारा VIDEO ) आग खालच्या मजल्यावर लागल्यानंतर ती रुग्णालयात येईपर्यंत रुग्णांना टेरेस किंवा मोकळया जागेत हॉस्पिटलने हलवण गरजेचं होतं, पण प्रत्यक्षात ते घडलं नाही. अवघे 2 एलपीजी सिलेंडर ठेवण्याची परवानगी असताना 45 सिलेंडर या मॉल मधील banquet हॉल मध्ये होते, जे की एक्सप्लोसिव्ह सबस्टन्स कायदा 1908 चं उल्लंघन आहे. मॉलमधील अग्निशमन यंत्रणा आणि वायुविजन यंत्रणा पूर्णपणे ठप्प होती, त्यामुळे 11 जणांचा मृत्यू झाला, असं या अहवालात म्हटल्याची सूत्रांची माहिती आहे. अहवाल सोमवारपर्यंत आयुक्तांना दिला जाऊ शकतो. रुग्णालयं आणि मॉल व्यवस्थापन यांची याबाबतीत चौकशी केली जाईल. यामध्ये कुणाचा दोष असेल तर कायद्याने त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घटनास्थळाला भेट दिल्यानंतर म्हणाले होते. त्यानुसार आता दोषींवर काय कारवाई होईल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. 25 मार्च रोजी लागलेली ही आग विझवण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करण्यात आले होते. यावेळी या रुग्णालयात 70 हून अधिक रुग्ण उपचार घेत होते.

संबंधित बातम्या

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या