JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / 'टारझन द वंडर कार' बनवणाऱ्या दिलीप छाब्रियांना अटक, काय आहे प्रकरण?

'टारझन द वंडर कार' बनवणाऱ्या दिलीप छाब्रियांना अटक, काय आहे प्रकरण?

छाब्रिया यांच्यावर फसवणूक, विश्वासघात आणि गुन्हाच्या कटात सहभागी असल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 29 डिसेंबर : देशातील सुप्रसिद्ध कार डिझायनर असलेले डीसी डिझाइनचे संस्थापक दिलीप छाब्रिया (Dilip Chhabria) यांना फसवणूक प्रकरणात अटक करण्यात आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. त्यांच्याकडून एक शानदार स्पोर्ट कार सुद्धा मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) जप्त केली आहे. डीसी (DC) असा लोगो एखाद्या कारवर असला म्हणजे त्या कारला दिलीप छाब्रिया यांचा स्पर्श झाला म्हणून समजा. डीसी या नावानेच त्यांना ओळख प्राप्त झाली. पण, सोमवारी त्यांच्याच व्यवसायाशी संबंधीत प्रकरणातून अटक करण्यात आली आहे. सोमवारी रात्री मुंबई पोलिसांनी दिलीप छाब्रिया यांना अटक केली. त्यानंतर त्यांच्याकडून एक शानदार स्पोर्ट्स कार जप्त केली आहे. त्यांच्याविरोधात कलम 420, 465, 467, 468, 471, 120 (बी) आणि 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. त्यांना अटक का आणि कशासाठी करण्यात आली, याबद्दल मुंबई पोलीस पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट करणार आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत कोरोनाचा शिरकाव, 37 उमेदवारांसह 13 कर्मचारी पॉझिटिव्ह दिलीप छाब्रिया यांनी एक शानदार स्पोर्ट्स कार तयार केली आहे. या कारचे मालक इंदरमल रमानी आहे. तामिळनाडूतील आरटीओ कार्यालयात त्यांच्या नावाने कार रजिस्टर करण्यात आले आहे. छाब्रिया यांच्यावर फसवणूक, विश्वासघात आणि गुन्हाच्या कटात सहभागी असल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणामध्ये आणखी लोकांना अटक होण्याची शक्यता आहे. या प्रकरणामागे एक मोठे रॅकेट असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. हे रॅकेट बेकायदेशीररित्या कारचे रजिस्ट्रेशन करत असल्याचा शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. जॉबची संधी! SSC CGL चं नोटिफिकेशन जाहीर, फॉर्म भरण्याची ‘ही’ आहे शेवटची तारीख दिलीप छाब्रिया यांनी गाड्यांना नव्याने डिझाइन करून देण्याचा ट्रेंड आणला. त्यांनी अनेक सेलिब्रिटींच्या गाड्यांचे आगळेवेगळे डिझाईन करून दिले होते. एवढंच नाहीतर अमिताभ बच्चन, शाहरुख खानपर्यंत अनेक कलाकारांच्या कार आणि व्हॅनिटी व्हॅन डिझाइन करून दिल्या आहे. ‘टारझन द वंडर कार’ चित्रपटामधील कार सुद्धा दिलीप छाब्रिया यांनीच डिझाइन केली आहे. या कारमुळे छाब्रिया यांना वेगळी ओळख मिळाली होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या