JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / 'साहेब, मी 24 तासात शिवसेनेला इतका वाईट झालो का?', एकनाथ शिंदेंचा फोनवर ठाकरेंना भावनिक सवाल

'साहेब, मी 24 तासात शिवसेनेला इतका वाईट झालो का?', एकनाथ शिंदेंचा फोनवर ठाकरेंना भावनिक सवाल

शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात फोनवर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 21 जून : शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यात फोनवर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. शिवसेनेचे नेते आणि उद्धव ठाकरे यांच्या अत्यंत जवळचे विश्वासू सहकारी मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) हे गुजरातच्या सूरत शहरात शिंदे यांच्या भेटीसाठी गेले होते. शिंदे सूरतमधील ली-मेरिडीअन या पंचतारांकीत हॉटेलमध्ये आपल्या समर्थक आमदारांसह थांबले आहेत. शिंदे यांची मनधरणी करण्यासाठी मिलिंद नार्वेकर हे गेले होते. यावेळी नार्वेकर आणि शिंदे यांच्यात अर्धा तास चर्चा झाली. यावेळी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात पंधरा मिनिटे फोनवर चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. यावेळी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांना भाजपसोबत जुळवून घेण्याची विनंती केली. तसेच शिवसेना कार्यकर्त्यांकडून विरोधात घोषणाबाजी केली जात असल्याने शिंदे भावूक झाले. साहेब, मी 24 तास इतका वाईट झालो का? असा भावनिक सवाल शिंदेंनी मुख्यमंत्र्यांना केला. एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री यांच्यात नेमकी काय चर्चा झाली? “साहेब, भाजपाशी जुळवून घ्या. मी 24 तासात इतका वाईट झालो का? माझ्या विरोधात घोषणाबाजी केली जातेय. माझे पुतळे जाळले जात आहेत. मी कोणालाही शब्द दिलेला नाही. मी कोणत्याही पेपरवर सही केली नाहीय. मी पक्षासाठी करतोय”, असं एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंना म्हणाले. ( सुरतेतील खलबतं अयशस्वी झाली तर महाराष्ट्राचं तख्त बदलणार? पुढील 2 तासात काय घडू शकेल ) एकनाथ शिंदे यांचे हे बोल ऐकून मुख्यमंत्र्यांनी देखील त्यांना धीर दिला. मुख्यमंत्र्यांनी त्यांना परत येण्याचं आवाहन केलं. “तू परत ये आपण चर्चा करु. आपण भेटून बोलू. झालं गेलं विसरून जा”, असं मुख्यमंत्री म्हणाले. पण तरीही शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांकडे वचन मागितलं. “मला तुमच्याकडून आश्वासन पाहिजे की आपण पुन्हा भाजपासोबत युती करु”, असं शिंदे मुख्यमंत्र्यांना म्हणाले. मिलिंद नार्वेकर आणि शिंदे यांच्यात काय चर्चा झाली? मिलिंद नार्वेकर यांच्या भेटीवेळी एकनाथ शिंदे यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन शिवसेनेने भाजपसोबत जावं, अशी मागणी केली. तसेच आपल्याला गटनेते पदावरुन का काढलं? असा सवाल शिंदेंनी नार्वेकरांना विचारला. “तुम्ही तुमचं ठरवा. मी माझं ठरवेल. एकीकडे चर्चा, दुसरीकडे निदर्शनं, तिसरीकडे अपहरणाचा आरोप, मगा या तिघांमध्ये मी नेमकं काय समजावं?”, असा सवाल शिंदेंनी केला. तसेच मला गटनेते पदावरुन हटवलं तरी संख्या माझ्याकडे अधिक आहे, असंही शिंदेंनी म्हटल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या