JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / शिंदे सरकारचा अजित पवारांना दणका, 13,340 कोटींचा 'तो' निधी रोखला

शिंदे सरकारचा अजित पवारांना दणका, 13,340 कोटींचा 'तो' निधी रोखला

राज्यात नव्यानं सत्तेवर आलेल्या एकनाथ शिंदे सरकारनं (Eknath Shinde Government) महाविकास आघाडी सरकारला दणका दिला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 7 जुलै : राज्यात नव्यानं सत्तेवर आलेल्या एकनाथ शिंदे सरकारनं (Eknath Shinde Government) महाविकास आघाडी सरकारला दणका दिला आहे. शिंदे सरकारनं 2022-23 या आर्थिक वर्षामधील जिल्हा विकास प्रकल्पांअंतर्गत देण्यात येणारा निधी रोखण्याचा निर्णय घेतला आहे. तब्बल 13 हजार 340 कोटींचा हा निधी आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या विभागासाठी हा निधी मंजूर केला होता. पण, शिंदे सरकारनं त्याला स्थगिती दिली आहे. नव्या पालकमंत्र्यांची नियुक्ती होईपर्यंत हा निधी दिला जाणार नाही, असं राज्य सरकारनं स्पष्ट केल्याचं वृत्त ‘टाईम्स ऑफ इंडिया’ नं दिलं आहे. विभागीय उपसचिव एस. एच. धुरी यांनी स्वाक्षरी केलेल्या नव्या सरकारी आदेशानुसार नव्यानं मान्यता देण्यात आलेला निधी रोखण्यात आला आहे. यामध्ये अजित पवार यांनी मान्यता दिलेल्या 13 हजार 340 कोटींच्या निधीचाही समावेश आहे. अजित पवार हे विकासकामांना निधी देताना भेदभाव करतात, शिवसेनेचे आमदार असलेल्या मतदारसंघाठी पुरेसा निधी देत नाहीत, असा आरोप शिंदे गटाच्या आमदारांनी यापूर्वी केला होता. ‘नव्या पालकमंत्र्यांची घोषणा लवकरच करण्यात येईल अशी अपेक्षा आहे. त्या परिस्थितीमध्ये वार्षिक नियोजनानुसार मंजूर झालेला निधी तसाच ठेवला जातो. नव्या पालकमंत्र्यांकडे कामांची यादी पाठवून ती मंजूर करण्यात येते. नियोजित काम मान्य करायची की नव्यानं नियोजन करायचं हा नव्या पालकमंत्र्यांचा अधिकार आहे,’ असे राज्य सरकारनं जारी केलेल्या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. नवलानी प्रकरणात दिलासा मिळाल्यानंतर किरीट सोमय्यांचा राऊतांना टोला, म्हणाले… राज्य सरकारच्या या निर्णयाला काँग्रेसनं विरोध केला आहे. हा निधी मंजूर होताना राजकारण झाल्याचा आरोप मुंबई उपनगराचे माजी पालकमंत्री अस्लम शेख यांनी फेटाळून लावला आहे. ‘वार्षिक जिल्हा विकास नियोजन ही दरवर्षीची प्रक्रिया आहे. जिल्हा विकास समिती आणि जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चेतून याची आखणी केली जाते. यामध्ये सर्व पक्षांची मतं ही समजून घेतली जातात.’ असं शेख यांनी सांगितलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या