JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / डॉ. अमोल कोल्हेंची पत्नी आहे 'कोरोना योद्धा', रुग्णसेवेसाठी डॉ. अश्विनीही मैदानात

डॉ. अमोल कोल्हेंची पत्नी आहे 'कोरोना योद्धा', रुग्णसेवेसाठी डॉ. अश्विनीही मैदानात

शिरूर मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या पत्नी डॉ. अश्विनी कोल्हे देखील रुग्णसेवा करत आहे. मुंबईतील केईएम रुग्णालयात त्या कोरोनाबाधितांची सेवा करत आहेत

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 05 मे : कोरोनाशी लढण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत आहे. कुणी निधी देऊन तर कुणी ‘कोरोना योद्धा’ बनून या संकटकाळात मदत करत आहे. या कठीण समयी कोरोनाशी दोन हात करणाऱ्या डॉक्टरांचे तर सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. दरम्यान शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या पत्नी डॉ. अश्विनी कोल्हे देखील रुग्णसेवा करत आहे. मुंबईतील केईएम रुग्णालयात त्या कोरोनाबाधितांची सेवा करत आहेत. त्या केईएममध्ये 2009 पासून कार्यरत आहेत. त्यामुळे आता अटीतटीचा प्रसंग असताना देखील त्या मागे हटलेल्या नाहीत. त्यामुळे सर्वत स्तरातून त्यांचे कौतुक केले जात आहे. (हे वाचा- पुणे प्रशासनाची गावी जाणाऱ्या मजुरांची पहिली यादी तयार ) रुग्णसेवेचा वसा घेतलेल्या अश्विनी कोल्हे या नित्यनियमाने रुग्णांची सेवा करत आहेत. घरची जबाबदारी सांभाळून त्या रुग्णसेवेचं व्रत पार पाडत आहेत. डॉ. अमोल कोल्हे देखील विविध माध्यमातून जनतेशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहेत. सध्याच्या परिस्थितीमध्ये सर्वांनी एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे. डॉ. अश्विनी कोल्हे आणि डॉ. अमोल कोल्हे हे दाम्पत्य ही मदत करताना दिसत आहेत. दरम्यान कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी देशभरामध्ये लॉकडाऊन 17 मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. मुंबई शहर रेड झोनमध्ये येत असल्याने याठिकाणी विशेष खबरदारी घेतली जात आहे. मात्र तरीही काही ठिकाणी सोशल डिस्टंसिंगचे पालन होत नसल्यामुळे भीती वाढत आहे. सामान्य नागरिक कोरोना योद्धा म्हणून काम करू शकत नसला, तरी प्रत्येकाने आपापली जबाबदारी ओळखून काम करणे गरजेचे आहे असं आवाहन सरकारकडून वेळोवेळी करण्यात येत आहे. संपादन - जान्हवी भाटकर

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या