JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / नराधम कंडोमऐवजी करायचे प्लॅस्टिक पिशवीचा वापर; डोंबिवली गँगरेप प्रकरणात धक्कादायक खुलासा

नराधम कंडोमऐवजी करायचे प्लॅस्टिक पिशवीचा वापर; डोंबिवली गँगरेप प्रकरणात धक्कादायक खुलासा

डोंबिवलीत एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर तब्बल 30 जणांनी सामूहिक बलात्कार (Dombivli Gang Rape Case) केल्याची घटना अलीकडेच उघडकीस आली आहे. याप्रकरणात आता दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

डोंबिवली, 25 सप्टेंबर: डोंबिवलीत एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर तब्बल 30 जणांनी सामूहिक बलात्कार (Dombivli Gang Rape Case) केल्याची घटना अलीकडेच उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी 23 आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. याप्रकरणात आता दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. गेल्या 9 महिन्यांपासून सामूहिक बलात्काराच्या यातना भोगणाऱ्या अल्पवयीन मुलीच्या मानलेल्या भावाने तिची ओळख आरोपीच्या मित्राशी करून दिली होती. संबंधित मित्राने तिची ओळख मुख्य आरोपीशी करून दिली होती. त्यानंतर मुलीवर अत्याचाराचं सत्र सुरू झाल्याचं पीडितेनं आपल्या तक्रारीत म्हटलं आहे. आरोपींनी कधी गुंगीचं औषध तर कधी दारू पाजून पीडितेला नरक यातना दिल्या आहेत. नराधम आरोपीने सर्वप्रथम 29 जानेवारी 2021 रोजी पीडितेला आपलं घर दाखवतो, असं सांगून पीडितेला मित्राच्या घरी घेऊन गेला होता. याठिकाणी आरोपीनं पीडितेला अश्लील व्हिडीओ (Shoot obscene videos) दाखवून जबरदस्तीने तिच्यावर बलात्कार केला होता. त्यानंतर घरातील अन्य आरोपींनी देखील पीडितेवर आळीपाळीने बलात्कार केला. या घटनेनंतर पीडितेन सर्व आरोपींशी सर्व संपर्क तोडला आणि त्यांचे मोबाइल नंबर डिलीट केले. पण आरोपीनं पुन्हा फेब्रुवारीमध्ये पीडितेला फोन करून भेटायला बोलवू लागला. तसेच भेटायला आली नाही. तर तुझे नग्न व्हिडीओ तुझ्या आई वडिलांना दाखवेन अशी धमकीही आरोपीने दिली. हेही वाचा- अत्याचारातून गरोदर राहिलेल्या मुलीची घरीच प्रसूती; 13 जणांवर गुन्हा दाखल आरोपीच्या धमकीला घाबरून पीडित मुलगी पुन्हा एकदा आरोपीला भेटायला गेली. आरोपीने पीडितेला आणखी एका मित्राच्या घरी नेऊन तिला शीतपेयातून गुंगीचं औषध दिलं. पण पीडितेनं संबंधित शीतपेय पिण्यास नकार दिल्याने त्याने ‘तुला विना कपड्याची घरी पाठवेन’ अशी धमकी दिली. यानंतर याठिकाणी देखील तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला.  मुख्य आरोपीने स्वत: पीडितेचे लचके तोडलेच पण तिच्यावर केलेल्या बलात्काराचा व्हिडीओ काढून तिला अनेकदा ब्लॅकमेलही केलं आहे. अशाचप्रकारे आरोपींनी व्हिडीओच्या आधारे तिच्यावर तब्बल आठवेळा सामूहिक बलात्कार केला आहे. आरोपींनी कधी गुंगीचं औषध तर कधी दारू पाजून पीडितेला नरक यातना दिल्या आहेत. हेही वाचा- डॉक्टर तरुणीवर बलात्कार; अश्लील VIDEO शूट करत पीडितेच्या आई-वडिलांना पाठवले अन्. गुन्हा दाखल होण्यापूर्वी 22 सप्टेंबर रोजी देखील सहा जणांनी पीडितेवर सामूहिक बलात्कार केला होता. पण आरोपींचा त्रास सहन होत नसल्याने शेवटी पीडितेनं सर्व प्रकार आपल्या आईला सांगितला. यानंतर या प्रकरणाला वाचा फुटली आहे. बलात्कार करत असताना आरोपींनी अनेकदा कंडोमऐवजी प्लॅस्टिकच्या पिशवीचा वापर केल्याचं देखील पीडितेनं आपल्या तक्रारीत म्हटलं आहे. या घटनेचा पुढील तपास मनपाडा पोलीस करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या