JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / Video: मुंबईची चहा क्विन वंदना शिरसाट; पतीची नोकरी सुटल्यानंतरही खंबीरपणे पाठिशी राहिली उभी

Video: मुंबईची चहा क्विन वंदना शिरसाट; पतीची नोकरी सुटल्यानंतरही खंबीरपणे पाठिशी राहिली उभी

चहा व्यवसायाचा विस्तार झाला असला तरी आजही या क्षेत्रामध्ये पुरुषांची मक्तेदारी आहे. मुंबईतील एका महिलेनं या व्यवसायात स्वत:ची ओळख निर्माण केलीय.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 13 जानेवारी : पारंपरिक चहा विकण्याच्या व्यवसायाला गेल्या काही दिवसांमध्ये ग्लॅमर प्राप्त झालं आहे. अनेक उच्चशिक्षित व्यक्ती या क्षेत्रात उतरले असून त्यांनी चहा विक्रीमध्ये स्वत:चा ब्रँड तयार केलाय. चहा व्यवसायाचा विस्तार झाला असला तरी आजही या क्षेत्रामध्ये पुरुषांची मक्तेदारी आहे. मुंबईतील एका महिलेनं पुरुषांची मक्तेदारी असलेल्या या क्षेत्रात स्वत:ची जागा निर्माण केलीय. मुंबईची चहा क्वीन म्हणून आज त्यांना अनेकजण ओळखतात. कसा झाला प्रवास? दादरच्या कालिका दर्शन इमारतीमध्ये राहाणाऱ्या वंदना शिरसाट घर कामासोबतच चहा विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांनी लॉकडाऊनमध्ये चहा विक्रीचा व्यवसाय सुरू केलाय. घरीच चहा बनवून त्या दादर, लोअर परळ, परिसरातील बँक, दुकांन, ऑफिसेसमध्ये जाऊन विकतात. इथं काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना फक्त 6 रुपयांमध्ये हा चहा जागेवर बसून मिळतो. वंदना यांनी हा व्यवसाय सुरू करण्यापूर्वी बराच संघर्ष केलाय. त्यांचे पती अनिल शिरसाट यांची 1997 साली नोकरी गेली. Video : चांगली नोकरी मिळाली नाही म्हणून सुरू केली हटके चहाची टपरी, पाहा Video या कसोटीच्या प्रसंगात घर चालवण्यासाठी त्या पतीच्या खांद्याला खांदा लावून उभ्या राहिल्या. घरोघरी दूध आणि पेपरची विक्री त्या करत असत. दूध विक्री, रांगोळी, कॅलेंडर, गुळ विक्री, मसाला पापड, वडापाव, नाशिक चिवडा असे अनेक व्यवसाय त्यांनी केले. पण, त्यांना कोणत्याही व्यवसायात यश मिळालं नाही. त्यानंत त्यांनी चहा विक्रीचा व्यवसाय करण्याचं ठरवलं.

‘माझे पती कुरिअर कंपनीत कामाला आहेत. आम्ही भाड्याच्या घरात राहतो. दुकानाचं भाडं सध्या आम्हाला परवणार नाही. पण, व्यवसाय व्यवस्थित सुरू राहिला तर लवकरच छोटं दुकान सुरू करण्याची इच्छा आहे,’ असं वंदनानं सांगितलं. महिलांनी व्यवसाय करताना लाजू नये. उत्साहानं काम करावं असा सल्ला त्यांनी दिला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या