JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / यंदा अशी साजरी करा ‘दिवाळी’, कोरोनाला रोखण्यासाठी सरकारने सांगितले 5 नियम

यंदा अशी साजरी करा ‘दिवाळी’, कोरोनाला रोखण्यासाठी सरकारने सांगितले 5 नियम

Diwali Celebration ‘दिवाळी पहाट कार्यक्रम आयोजन करू नये, करायचे असल्यास ऑनलाइन आणि सोशल मीडिया माध्यमातून कार्यक्रम करावे.’

जाहिरात

Varanasi: Foreign tourists light candles and burn crackers during Diwali celebrations, in Varanasi, Sunday, Oct. 27, 2019. (PTI Photo)(PTI10_28_2019_000044B)

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 05 नोव्हेंबर:  राज्यात कोरोनाचा आलेख (Maharashtra Coronavirus) खाली येत असतानाच राज्य शासनाची चिंता दिवाळीमुळे (Diwali) वाढली आहे. या काळात लोकांची गर्दी वाढेल आणि एकत्र येणंही वाढेल त्यामुळे कोरोनाचा प्रसार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. थंडी वाढल्याने दुसऱ्या लाटेची शक्यता व्यक्त केली जात आहे. कोरोना काळात दिवाळी असल्याने त्याविषयी राज्य सरकारने सुरक्षा नियमावली जाहीर केली आहे. सगळ्यांनी त्याचं पालन करावं असं आवाहनही सरकारने केलं आहे. दिवाळीच्या 5 मार्गदर्शक सूचना राज्य सरकारने गृह विभागाने जारी केल्या आहेत. दिवाळीत प्रदूषण होऊ नये ही बाब विचारात घेऊन फटाके फोडणे टाळावे त्याऐवजी दिव्यांची आरास करून दिवाळी साजरी करावी. दिवाळी पहाट कार्यक्रम आयोजन करू नये, करायचे असल्यास ऑनलाइन आणि सोशल मीडिया माध्यमातून कार्यक्रम करावे. सांस्कृतिक कार्यक्रमांच्या ऐवजी संस्थांनी रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिरांवर भर दिला जावा धार्मिक स्थळ अद्याप खुली केलेली नाही त्यामुळे सण घरगुती पद्धतीने सध्या स्वरूपात साजरा करावा. दरम्यान, कोरोनामुळे यंदाची दिवाळी फटाकेमुक्त असावी असा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचा प्रयत्न आहे. हिवाळ्यात आधीच प्रदुषणात वाढ होते. त्यात फटाक्यामुळे जास्त प्रदुषण होण्याची शक्यता आहे. दिवाळीनंतरच दुसऱ्या लाटेची शक्यताही तज्ज्ञांनी व्यक्त केल्याने राज्य सरकार सावध झालं आहे. दिवाळीत यंदा दिल्लीत आतषबाजी नाही, फटाक्यांवर घातली बंदी दिवाळीनंतर थंडीत येणारी कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता असून राज्य सरकारने या दुसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी तयारी सुरू केली आहे. त्यामुळे फटाके फोडण्यावर बंदी येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे या बंदीबाबतचा प्रस्ताव राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत मांडण्याची शक्यता आहे. दिवाळीआधी लखपती बनण्याची सुवर्णसंधी! ‘ही’ नोट बनवेल तुम्हाला श्रीमंत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नेमण्यात आलेले राज्य टास्क फोर्स व डेथ ऑडिट कमिटीची बैठक आज आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी घेतली. कोरोनामुळे होणारा मृत्यूदर कमी करणे आणि कोरोनाच्या संभाव्य दुसऱ्या लाटेच्या पूर्वतयारीबाबत आढावा यावेळी घेण्यात आला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या