मुंबई, 25 मे: तौक्ते चक्रीवादळ (cyclone tauktae) शमले जरी असले तरी कोकण दौऱ्यावरून भाजप (BJP) आणि शिवसेनेत (Shivsena) आरोप प्रत्यारोप सुरूच आहे. शिवसेनेचे नेते, राज्याचे उच्चशिक्षण आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) आणि भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांची गुप्त भेट झाल्याचा दावा भाजपचे नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी केला होता. पण, उदय सामंत यांनी हे वृत्त फेटाळून लावले आहे. उदय सामंत यांनी निलेश राणे यांच्या दाव्यातून हवा काढत खुलासा केला आहे. ‘20 मे 2021 रोजी रत्नागिरी शहरातील शासकीय विश्रामगृहात मी दुपारी 1 वाजता चक्रीवादळ नुकसानीचा आढावा घेत होतो. त्यावेळी दुपारी 2 वाजता माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विधान सभा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, विधान परीषद विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, भाजप आमदार प्रसाद लाड हे त्या ठिकाण पहाणी दौरा आटपून आले होते. त्यावेळी उदय सामंत आणि भाजप नेते यांच्यात 2 मिनिटांची सदिच्छा भेट झाली असल्याची माहिती स्वत: उदय सामंत यांनीच जाहीर केली. विरुष्कामुळे वाचले चिमुरड्याचे प्राण,इंजेक्शनसाठी 16 कोटी उभारायला सेलेब्सची मदत भाजपचे पदाधिकारी निलेश राणे यांनी ही भेट गुप्त असल्याचं एका व्हिडीओद्वारे प्रसिद्ध केला आहे. मात्र ही कोणतीची गुप्त भेट नव्हती तर उघडपणे सर्वांसमोर सदिच्छा भेट झाली. यात कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचा दावा उदय सामंत यांनी केला आहे. तर, दुसरीकडे निलेश राणे यांनी ट्वीट करून खुलासा केला आहे.
‘देवेंद्र फडणवीस जेव्हा वादळाची पाहणी करायला कोकणात आले होते, तेव्हा रत्नागिरी गेस्टहाऊसवर उदय सामंत व त्यांचे बंधू त्यांना भेटायला तडफडत होते. दोघेही कसेतरी साहेबांच्या रूमपर्यंत पोचले व देवेंद्र फडणवीस यांची इच्छा नसतानाही त्यांना भेटले. प्रसार माध्यमं काय भलतच दाखवत आहेत, कृपया दुरुस्ती करावी, असं निलेश राणे म्हणाले.