मुंबई, 14 जूनः एकेकाळी कोरोना व्हायरसचा हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीतून दिलासादायक बातमी समोर आली आहे. पहिल्यांदाच धारावीत शून्य रुग्ण संख्येची नोंद झाली आहे. कोविड 19 संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत धारावीत पहिल्यांदा शून्य रुग्ण संख्या नोंदवण्यात आली आहे. (Dharavi COVID 19 zero new cases)गेल्या 24 तासात तेथे एकही रुग्ण सापडला नाही. धारावीत दैनंदिन कोरोना रुग्णसंख्या प्रथमच शून्यावर आली आहे. जी / उत्तर (G/North Ward )वॉर्डमधील कोरोनाबाधित रुग्णांची आकडेवारी मुंबई पालिकेनं जाहीर केली. या आकडेवारीनुसार, (Brihanmumbai Municipal Corporation )या वॉर्डमध्ये केवळ 9 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यात कोरोनाच्या पहिल्या लाटेत हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीत पहिल्यांदा एकही रुग्ण आढळून आला नाही. याआधी एक दिवस हा आकडा दोन वर होता. सध्या धारावीत एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 6 हजार 861 इतकी आहे. तर दादरमध्ये 3 तर माहिममध्ये 6 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेत. हेही वाचा- Corona Virus: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय दादरमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या 9 हजार 557 इतकी आहे. माहिममध्ये कोरोनाबाधितांची एकूण आकडा 9 हजार 876 वर पोहोचला आहे.जी/ उत्तर वॉर्डमध्ये एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 26 हजार 294 इतका झाला आहे.