JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / अजित पवारांचा 'तो' मुद्दा फडणवीसांनी अधिवेशनापूर्वीच निकाली काढला; थेट कंपनीचा परवानाच रद्द

अजित पवारांचा 'तो' मुद्दा फडणवीसांनी अधिवेशनापूर्वीच निकाली काढला; थेट कंपनीचा परवानाच रद्द

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत विरोधकांवर टीका केली आहे.

जाहिरात

अजित पवारांचा 'तो' मुद्दा फडणवीसांनी अधिवेशनापूर्वीच निकाली काढला

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 26 फेब्रुवारी : एकीकडे राज्यात अनेकविध मुद्द्यांवरून राज्यातील राजकारण तापलेले असताना दुसरीकडे राज्याच्या अर्थसंकल्पी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. यातच शिंदे-फडणवीस सरकारला घेरण्यासाठी विरोधकांकडून तयारी केली जात असल्याचे सांगितले जात आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी एका शेतकऱ्याचा व्हिडीओ दाखवून त्याची व्यथा मांडली होती. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ दखल घेत 2 रुपयांचा चेक देणाऱ्या कंपनीवर कारवाई केली आहे. अधिवेशनापूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली. काय म्हणाले देवेंद्र फडणवीस? 512 किलो कांदे विकणाऱ्या कांदा उत्पादकाला अडत व्यापाऱ्याने दोन रुपयांचा धनादेश दिला होता. या धनादेशाची सर्वत्र चर्चा झाली. याचा व्हिडीओ तयार करुन शेतकऱ्याने विरोधी पक्षनेते अजित पवार यांना पाठवला होता. यानंतर पवारांनी माध्यमांसमोर या शेतकऱ्याची व्यथा मांडली होती. याची दखल आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही घेतली आहे. सूर्या ट्रेडींग कंपनीचा परवाना रद्द करण्यात आला असल्याची माहिती फडणवीस यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. यावेळी कमी प्रतीच्या कांद्यातून वाहतुकीचा खर्च करता येणार नाही. असा खर्च वजा करुन 2 रुपये चेक देणाऱ्या सूर्या ट्रेडींग कंपनीचा परवाना रद्द करण्यात आला असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले. कांदा निर्यात होणाऱ्या तिन्ही देशात परकीय चलनाची तूट आहे. त्यामुळे कांदा निर्यात होण्यास अडचण आहे. भारताशेजारील तिन्ही देशात परकीय चलनाची तूट असल्याने कांद्याचे दर घसरल्याचेही फडणवीस यांनी सांगितले. वाचा - ठाकरे गटातील अंतर्गत धुसफूस पुन्हा चव्हाट्यावर; माजी मंत्र्याविरोधात शिवसैनिक आक्रमक दोन एकरातील कांद्याचे दोन रुपये मिळाले राज्यभरात कांद्याची घसरण होत आहे. सोलापुरात देखील त्याचा फटका एका शेतकऱ्याला बसला. सोलापूर आणि उस्मानाबादच्या सीमेवर दिवसरात्र राबराब राबून मोठ्या कष्टाने पिकवलेल्या 512 किलो कांद्याचे फक्त 2 रुपये पदरात पडल्याने शेतकरी हवालदिल झाला होता. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील बोरगाव (झाडी) या गावातील राजेंद्र तुकाराम चव्हाण या शेतकऱ्याने आपल्या 2 एकर शेतात कांद्याची लागवड केली होती. कांद्यातून मिळालेल्या पैशातून आपल्यावर असलेले देणे देऊ या उद्देशातून राजेंद्र चव्हाण यांनी भाव कमी असल्याने दहा पोते कांदा 17 फेब्रुवारी 2023 रोजी सोलापुरातील सुर्या ट्रेडर्स यांच्याकडे घेऊन गेले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या