मुंबई, 3 जून : निसर्ग चक्रीवादळाचा विद्ध्वंस मुंबईत फार दिसला नाही, पण उपनगरांमध्ये मात्र सोसाट्याच्या वाऱ्यामुळे काही ठिकाणी मोठं नुकसान झालं. डोंबिवलीत दुपारी 3 नंतर जोरदार वाऱ्यासह आलेल्या पावसाने त्रेधा उडवली. अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटल्या. डोंबिवलीत सारस्वत कॉलनी येथील आशिष नावाच्या इमारतीच्या गच्चीवरील पत्रा सोसाट्याचा वाऱ्यामुळे उडून खाली पडला. त्याचा VIDEO सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
डोंबिवलीतच जोरदार वाऱ्यांमुळे कल्याण- शीळ रोडवर काटई नाक्याजवळ भर रस्त्यात लावलेला जाहिरातीचा लोखंडी बोर्ड कोसळला. नशिबाने रस्त्यावर कुणी नसल्यामुळे जीवितहानी झाली नाही. अख्खंच्या अख्खं होर्डिंग खाली येतानाचा हा VIDEO सुद्धा व्हायरल झाला आहे.
निसर्ग चक्रीवादळ (Cyclone Nisarg) रायगड जिल्ह्यात दुपारी एकच्या सुमारास जमिनीवर धडकलं. मुंबई आणि ठाणे परिसरात ताशी 80 किमी वेगाने वारे वाहू शकतात, असा इशारा हवामान विभागाने दिला होता. निसर्ग वादळाचं केंद्रक ठाणे जिह्याकडून पुढे सरकत आहे. त्यामुळे पुढचे काही तास घराबाहेर पडणं टाळा, असं आवाहन करण्यात आलं आहे. अन्य बातम्या निसर्ग चक्रीवादळ धडकल्यानंतरचे VIDEO आले समोर, काळीज होईल धस्स ‘या’ जिल्ह्यातून जाणार वादळ! अजगराच्या तावडीतून तरुणानं अशी केली हरणाची सुटका, VIDEO VIRAL