JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / Mumbai विमानतळावर मोठी कारवाई, आई आणि मुलीकडून 25 कोटींचे अमली पदार्थ जप्त

Mumbai विमानतळावर मोठी कारवाई, आई आणि मुलीकडून 25 कोटींचे अमली पदार्थ जप्त

Heroin Seized at Mumbai Airport: मुंबई विमानतळावर मोठी कारवाई करण्यात आली आहे.

जाहिरात

मुंबई विमानतळावर मोठी कारवाई, कोट्यवधी रुपयांच्या अमली पदार्थांसह आई-मुलगी अटकेत (Representative Image)

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 22 सप्टेंबर : मुंबई विमानतळावर (Mumbai Airport) कस्टम विभागाने एक मोठी कारवाई केली आहे. विमानतळावर तब्बल 4.95 किलो हेरॉईन जप्त (4.95 kg heroine seized) करण्यात आले आहे. जोहान्सबर्ग येथून आलेल्या दोन महिलांकडून हे अमली पदार्थ जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. अटक करण्यात आलेल्या या दोन महिला आई-मुलगी आहेत. रिपोर्ट्सनुसार, आत्तापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई आहे. काही दिवसांपूर्वी डीआरआयने गुजरातमधील मुंद्रा बंदरावर जवळपास 3 हजार किलो हेरॉईन जप्त केले होते. इंडियन एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार, कतार एअरलाईन्समध्ये प्रवास करणारी आई-मुलगी या जोहान्सबर्ग येथून मुंबईला येत होत्या. फुफ्फुसाच्या कर्करोगावर उपचाराच्या नावाखाली या दोघीही भारतात आल्या होत्या असे रिपोर्टमध्ये सूत्रांच्या हवाल्याने सांगितले आहे. एजन्सीच्या मते, या तस्करांनी ट्रॉली बॅगमध्ये हेरॉईन लपवून टेवले होते. अधिकाऱ्यांच्या मते, सहसा प्रवासी एकावेळी दोन किलोपेक्षा जास्त औषधे घेऊन प्रवास करत नाहीत. कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे हेरॉईन भारतात आणण्यासाठी दोन्ही महिला प्रवाशांना प्रत्येकी 5 हजार डॉलर देण्याचं सांगण्यात आलं होतं. दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना 5 ऑक्टोबरपर्यंत न्यायलयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, या प्रकरणात भारतातील आणखी कोणी सहभागी आहे का? याचा तपास आता करण्यात येत आहे. विकृत! BOUNCER ने पैशांसाठी केलं कोट्यधीश तरुणीशी अफेअर, सेक्स करताना केला खून गुजरातमध्ये मोठी कारवाई अलीकडेच डीआरआयने गुजरातच्या मुंद्रा येथून दोन कंटेनरमधून 2 हजार 922.22 किलो हेरॉईन जप्त केले होते. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली होती आणि त्यासोबतच काही अफगाणिस्तानी नागरिकांचीही चौकशी केली जात होती. डीआरआयच्या अधिकाऱ्यांना या हेरॉईनच्या संदर्भात गुप्त माहिती मिळाली होती आणि त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. इनपुटच्या आधारे डीआरआयने दोन कंटेनर अडवले आणि गांधीनगर येथील फॉरेन्सिक सायन्स लॅबच्या एक्सपर्टच्या उपस्थितीत कंटेनरची तपासणी करण्यात आली. द हिंदूच्या रिपोर्टमध्ये सूत्रांच्या हवाल्याने सांगण्यात आले आहे की, एक्सपर्ट्सने सामानाची तपासणी केली आणि हेरॉईन असल्याची पुष्टी केली. त्यानंतर हा सर्व अमली पदार्थाचा साठा जप्त केला. मुलाने केली आई, वडील, बहीण आणि कुत्र्यांचीही हत्या एका अल्पवयीन मुलाने आपले आई, वडील आणि बहिणीची हत्या केली. त्यानंतर घरातील दोन पाळीव कुत्र्यांनाही त्याने गोळ्या घालून ठार केले. या सर्वांची हत्या केल्यानंतर त्याने स्वतःवरही गोळी झाडली आणि आपलं आयुष्य संपवलं. या घटनेनं सर्वांनाच धक्का बसला आहे. अमेरिकेतील टेक्सासमध्ये राहणाऱ्या 15 वर्षांच्या मुलाने आपल्या पूर्ण कुटुंबाला संपवल्याची बातमी ‘मिरर युके’नं दिली आहे. या मुलानं त्याची आई जाना कोलबर्नला तिच्या वाढदिवशीच गोळ्या घातल्या. त्यानंतर वडील विलियम कोलबर्न यांच्यावर गोळ्या झाडून त्यांना ठार केलं. मग 13 वर्षांची बहीण एम्मालाही त्याने गोळीबार करून संपवलं. तिथेच असणाऱ्या घरातील दोन पाळीव कुत्र्यांनादेखील त्याने गोळ्या घातल्या आणि त्यांचा बळी घेतला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या