JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / राज्यात आजही कोरोनारुग्णांच्या संख्येत विक्रमी 6741 जणांची वाढ, तर 213 मृत्यू; मुंबईचा धोका कायम

राज्यात आजही कोरोनारुग्णांच्या संख्येत विक्रमी 6741 जणांची वाढ, तर 213 मृत्यू; मुंबईचा धोका कायम

मुंबईत (Mumbai Coronavirus update) आज 954 नवे रुग्ण आढळले. तर 70 जणांचा मृत्यू झाला. मुंबईतल्या एकूण रुग्णांची संख्या 95100 तर मृत्यूसंख्या 5405वर गेली आहे.

जाहिरात

राज्य सरकारने ‘माझं कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहिम राबवल्याने कोविड रुग्ण शोधण्यास मदत झाली आणि जनजागृतीही झाली.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 14 जुलै: मुंबई आण राज्यात कोरोना रुग्णांच्या (Covid-19 Patient) संख्येत सुरु असलेली विक्रमी वाढ कायम आहे. आज 6741 नव्या रुग्णांची भर पडली तर 213 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातल्या एकूण रुग्णांची संख्या 2,67,665 एवढी झाली आहे. तर मृत्यूची संख्या 10695 एवढी झाली आहे. मुंबईत (Mumbai Coronavirus update) आज  954 नवे रुग्ण आढळले. तर 70 जणांचा मृत्यू झाला. मुंबईतल्या एकूण रुग्णांची संख्या 95100 तर मृत्यूसंख्या 5405वर गेली आहे. देशात  दररोज काही हजारांमध्ये नव्या रुग्णांची भर पडत आहे. अशी परिस्थिती असतानाही काही गोष्टी भारतासाठी दिलासादायक आहेत असा दावा ICMRने केला आहे. संस्थेचे संचालक बलराम भार्गव (Balram Bhargava DG ICMR) यांनी पत्रकार परिषद घेऊन हा दावा केला आहे. भार्गव यांनी जगातल्या इतर देशांशी तुलना करताना तीन मोठ्या गोष्टी सांगितल्या. या गोष्टी भारतासाठी दिलासा देणाऱ्या आहेत. भार्गव म्हणाले, भारतात आता चाचण्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. रुग्णांची संख्या आणि मृत्यूची संख्या यात वाढ होत असली तरी परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेलेली नाही. केंद्र आणि सर्व राज्य सरकारे मिळून प्रयत्न करत असून कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात यश येईल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. ‘बकरी ईदही घरीच साजरी करा’; मुख्यमंत्री करणार मौलवींशी चर्चा प्रत्येक 10 लाख चाचण्या केल्यानंर भारतात 657 नवे रुग्ण आढळतात. तर इतर देशांमध्ये हे प्रमाण 14 टक्के जास्त आहे. भारतात 10 लाख लोकांमागे मृत्यूचा दर हा 17.2 असून इतर देशांमध्ये 35 टक्के जास्त आहे. देशात रुग्णवाढीचा दर कमी होत असून 31.28 टक्क्यांवरून तो दर 12 जुलैरोजी 3.24 टक्क्यांवर आला असा दावाही त्यांनी केला आहे. वाढणारा आलेख आता कमी होत आहे ही दिलासा देणारी बाब असल्याचंही भार्गव यांनी स्पष्ट केलं. बच्चन कुटुंबाच्या घरापर्यंत कसा पोहोचला कोरोना? आता असा होणार तपास देशातल्या एकूण रुग्णसंख्येपैकी 50 टक्के रुग्णांची संख्या ही महाराष्ट्रा आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये आहे. देशात सध्या 311565 Active रुग्ण असून आत्तापर्यंत 571459 लाख रुग्ण बरे झाले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या