JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / राज्यात कोरोनाचे 21 हजार नवीन रुग्ण, दिवसभरात 479 जणांचा मृत्यू

राज्यात कोरोनाचे 21 हजार नवीन रुग्ण, दिवसभरात 479 जणांचा मृत्यू

Maharashtra Covid-19 Update: आत्तापर्यंत 9 लाख 56 हजार रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात सध्या 2 लाख 72 हजार रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

जाहिरात

दररोजच्या रुग्ण संख्येने केरळने (Kerala) महाराष्ट्रालाही (Maharashtra) मागे टाकलं आहे.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 23 सप्टेंबर: राज्यात बुधवारी 21 हजार करोनाचे नवीन रुग्ण आढळून आलेत तर 479 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे कोरोना रुग्णांची एकूण संख्या ही 12 लाख 63 हजार झाली आहे. गेल्या 24 तासांमध्ये 19 हजार 476 रुग्ण बरे होऊन घरी गेले. गेल्या काही दिवसांपासून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ही नव्या रुग्णांपेक्षा जास्त होती. त्यात आता खंड पडला आहे. आत्तापर्यंत 9 लाख 56 हजार रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात सध्या 2 लाख 72 हजार रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्याचा रिकव्हरी रेट वाढला असून तो 75.65वर गेला आहे. तर मृत्यू दर 2.68 टक्के एवढा आहे. राज्यात सध्या 18 लाखांपेक्षा जास्त जण होम क्वारंटाइन आहेत अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. गडचिरोली (Gadchiroli) जिल्ह्यात कोरोनाबाधित (Coronavirus) रुग्ण संख्येनं पहिल्यांदा 2 हजाराचा आकडा ओलांडला आहे. तरी जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या राज्यात सर्वात कमी आहे. मात्र, गडचिरोली शहरात वाढलेल्या रुग्ण संख्या पाहाता प्रशासनानं ‘जनता कर्फ्यू’ची घोषणा केली आहे. बुधवारपासून जनता कर्फ्यूला सुरुवात झाली आहे. आपण यातून कधी बाहेर पडणार? कोरोना पॉझिटिव्ह होताच श्वेता तिवारीला कोसळलं रडू भारतात पुण्याच्या सीरम इन्स्टिट्युमार्फत (serum institute of india) ऑक्सफर्डच्या कोरोना लशीचं (corona vaccine) क्लिनिकल ट्रायल सुरू आहे. ही लस इंजेक्शनमार्फत दिली जाते. मात्र आता भारतात फक्त इंजेक्शनमार्फतच नाही तर नाकावाटेही कोरोना लस दिली जाणार आहे. सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाने Nasal corona vaccince चं उत्पादन सुरू केलं आहे. सावधान! फेक ऑक्सिमीटर App वापरणं ठरू शकतं धोकादायक अमेरिकेच्या कोडाजेन्सिक्स (Codagenix Inc.) या कंपनीने नाकावाटे दिली जाणारी कोरोना लस तयार केली आहे. CDX-005 असं या लशीचं नाव आहे. या लशीत पुण्याच्या सीरम संस्थेची भागीदारी आहे. या लशीच्या प्री-क्लिनिकल चाचण्या पूर्ण झाल्या असून आता लवकरच क्लिनिल चाचण्या होणार आहेत. सीरम इन्स्टिट्युटला या लशीचं भारतात उत्पादन घेण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या