JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / Covid Task Force च्या डॉक्टरांचा गंभीर इशारा! मुंबईत आज 20 हजारहून अधिक रुग्ण पॉझिटिव्ह येण्याची शक्यता

Covid Task Force च्या डॉक्टरांचा गंभीर इशारा! मुंबईत आज 20 हजारहून अधिक रुग्ण पॉझिटिव्ह येण्याची शक्यता

महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोनाचा उद्रेक (Corona outbreak) पाहायला मिळतोय. दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 6 जानेवारी: महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोनाचा उद्रेक (Corona outbreak) पाहायला मिळतोय. दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. मुंबईत काल दिवसभरात तब्बल 15 हजारांपेक्षाही जास्त नवे कोरोनाबाधित (coronavirus patients) रुग्ण आढळले आहेत. अशातच महाराष्ट्र कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉक्टर शशांक जोशी यांनी ट्विट करत भीती व्यक्त केली आहे. त्यांनी मुंबई येथील कोरोनाची सद्य परिस्थीती पाहता ट्विट केले आहे. ‘मुंबईत आज 20 हजारहून अधिक रुग्ण पॉझिटिव्ह येण्याची शक्यता आहे. अत्यावश्यक काम नसल्यास घरीच थांबा. योग्य प्रकारे मास्क लावा आणि लक्षणे असल्यास तुमच्या डॉक्टरांशी संपर्कात रहा. सतर्क रहा , सावध रहा सुरक्षित रहा.’ असे आवाहन त्यांनी ट्वीटमध्ये केले आहे.

संबंधित बातम्या

तसेच, बहुतेक प्रकरणे अजूनही सौम्य आहेत. असे मतही त्यांनी ट्विटमध्ये व्यक्त केले आहे.   मुंबईत कोरोनाचा Outbreak,तीन दिवसात 230 निवासी डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह मुंबईत काल दिवसभरात तब्बल 15 हजारांपेक्षाही जास्त नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. विशेष म्हणजे चाचणी करणाऱ्या प्रत्येक तीन जणांनंतर चौथी व्यक्ती कोरोनाबाधित आढळत आहे. त्यामुळे कोरोनाचा पॉझिटिव्ही रेट हा थेट 25 टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यामुळे प्रशासनाची देखील चिंता वाढली आहे. प्रशासन या संकटाला सामोरं जाण्यासाठी सज्ज आहे. पण ही रुग्णवाढ लवकरात लवकर थांबवणं आणि कमी करणं हे प्रशासनापुढे आताच्या घडीतील सर्वात मोठं आव्हान आहे. याशिवाय कोरोनाचा रिकव्हरी रेट हा दोन टक्क्यांनी खाली घसरला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या