JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / 'जॉन्सन अँड जॉन्सन'ला कोर्टाचा दिलासा, बेबी पावडर विक्रीला परवानगी, FDA ला धक्का

'जॉन्सन अँड जॉन्सन'ला कोर्टाचा दिलासा, बेबी पावडर विक्रीला परवानगी, FDA ला धक्का

या पावडरमध्ये असलेल्या काही घटकांमुळे कॅन्सर होत असल्याचं समोर आल्यानंतर, जगभरातून कंपनीविरोधात हजारो केसेस दाखल झाल्या होत्या

जाहिरात

या पावडरमध्ये असलेल्या काही घटकांमुळे कॅन्सर होत असल्याचं समोर आल्यानंतर, जगभरातून कंपनीविरोधात हजारो केसेस दाखल झाल्या होत्या

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 11 जानेवारी : जॉन्सन अँड जॉन्सन या अमेरिकेतल्या कंपनी आपल्या टाल्क-बेस्ड बेबी पावडरच्या उत्पादनामुळे अडचणीत सापडली होती. या पावडरमध्ये असलेल्या काही घटकांमुळे कॅन्सर होत असल्याचं समोर आल्यानंतर, जगभरातून कंपनीविरोधात हजारो केसेस दाखल झाल्या होत्या. पण, मुंबई कोर्टाने या कंपनीला मोठा दिलासा दिला असून पावडर विक्रीला परवानगी दिली आहे. जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीच्या टाल्क-बेस्ड बेबी पावडरला FDA नं बंदी घातली होती. या प्रकरणी आज हायकोर्टामध्ये सुनावणी झाली. FDA ने बंदी घातलेला आदेश हायकोर्टाकडून रद्द करण्यात आला आहे. मात्र, हायकोर्टानं जॉन्सन अँड जॉन्सन अटी घातल्या आहेत. तपासणी केलेल्या संचातील सर्व माल कंपनीनं नष्ट करावा आणि आक्षेप घेण्यात आलेल्या संचातील पावडरचा एकही डब्बा बाजारात विक्रीसाठी जाता कामा नये, असे आदेश हायकोर्टाने दिले आहे. जॉन्सन जॉन्सन कंपनीनं सर्व अटी मान्य केल्या आहेत. त्यामुळे बेबी पावडर विक्रीचा मार्ग मोकळा झाला आहे. (Cancer : सर्वच गाठी कर्करोगाच्या नसतात, पाहा कॅन्सरची गाठ कशी ओळखावी?) गेल्या वर्षी ‘नॅशनल कमिशन ऑफ प्रोटेक्शन फॉर चाइल्ड राइट्स’ने (NCPCR) डीसीजीआय आणि सीडीएससीओ (CDSCO) या दोन्ही संस्थांना समन्स पाठवले होते. जॉन्सन अँड जॉन्सनच्या बेबी शॅम्पू आणि टाल्कम पावडरमध्ये फॉर्माल्डिहाइड (Formaldehyde) आणि अ‍ॅस्बेस्टोस (मानवांमध्ये कॅन्सर तयार होण्यासाठी कारणीभूत मानले जाणारे घटक) या घटकांची उपस्थिती तपासण्यासाठीच्या चाचणी पद्धतीत एकसमानता का नाही, याबाबत या दोन्ही संस्थांनी हजर राहून स्पष्टीकरण देण्यास सांगण्यात आलं होतं. (हिवाळ्यातील टॉन्सिलच्या त्रासाकडे अजिबात दुर्लक्ष करू नका, बनू शकते कॅन्सरचे कारण) गेल्या कित्येक वर्षांपासून भारतात कंपनीच्या या उत्पादनांविरोधात कारवाई करण्यात येत होती. 2013 साली महाराष्ट्र ड्रग रेग्युलेटरने कंपनीचं लायसन्स रद्द केलं होतं. कंपनीच्या पावडर बनवणाऱ्या एका कारखान्यात इथिलिन ऑक्साइडचा वापर (कॅन्सरला कारणीभूत ठरणारे केमिकल) करण्यात येत असल्याचं स्पष्ट झाल्यामुळे ही कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर 2018 मध्ये इंडियन ड्रग रेग्युलेटरने सदोष हिप इम्प्लांट विकल्याबद्दल रुग्णांना भरपाई देण्याचे आदेश कंपनीला दिले होते. 2019च्या फेब्रुवारीमध्ये जॉन्सन बेबी शाम्पूच्या नमुन्यांची चाचणी केली असता, त्यात फॉर्माल्डिहाइड हा घटक आढळून आला; मात्र नंतर गुजरातच्या नियामक संस्थेने या उत्पादनाला हिरवा कंदील दाखवला होता. गेल्या वर्षी जॉन्सन अँड जॉन्सनने आपल्या पाच सनस्क्रीन प्रॉडक्ट्सचे सर्व लॉट्स परत बोलावले होते. या सनस्क्रीनमध्ये बेंझीन या घटकाची मात्रा आढळली होती. बेंझीन वारंवार संपर्कात आल्याने त्वचेचा कॅन्सर होऊ शकतो. यामुळ कंपनीने स्वतः ही उत्पादनं परत मागवली होती, अशी माहिती जॉन्सन अँड जॉन्सनकडून देण्यात आली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या