मुंबई, 04 एप्रिल : राज्यात कोरोनाचे (Corona) संकट दिवसेंदिवस आणखी गडद होत चालले आहे. राज्यात गेल्या 24 तासांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची ( Corona Patient) संख्या ही 50 हजार पार झाली आहे. राज्यात एकाच दिवसामध्ये तब्बल 57 हजार रुग्णांची भर पडली आहे. तर एकाच दिवसात तब्बल 222 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्य सरकारच्या वतीने गेल्या 24 तासातील कोरोनाबाधित रुग्णांची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. आज 27,508 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे. तर राज्यात आजपर्यंत एकूण 25,22,823 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 83. 8% वर पोहोचला आहे. गर्लफ्रेंडने नशेत असलेल्या बॉयफ्रेंडचा Private Part कापून टॉयलेटमध्ये केला फ्लश आज राज्यात 57,074 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. गेल्या 24 तासांत 222 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.86% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 2,05,40,111 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 30,10,597 (14.66 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 22,05,899 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 19,711 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात एकूण 4,30,503 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. शनिवारी राज्यात 49 हजार कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली होती. त्यानंतर आता थेट 50 हजार कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा पार झाला आहे. अशोक चव्हाणांनी भाजपला चारली धुळ, होमग्राऊंडमध्ये फडकावला महाविकास आघाडीचा झेंडा दरम्यान, कोरोनाचा झपाट्याने वाढता संसर्ग रोखण्यासाठी राज्य मंत्री परिषदेने आज काही कडक निर्बंध लावण्यावर शिक्कामोर्तब केले आहे. सोमवार 5 एप्रिल रात्री 8 पासून 30 एप्रिलपर्यंत याची अंमलबजावणी केली जाईल. हे निर्बंध लावतांना एकीकडे राज्याच्या अर्थव्यवस्थेला धक्का न लावणे आणि कामगार व श्रमिकांना त्रास न होण्याची काळजी घेण्यात आली असून लोकांची गर्दी होणारी ठिकाणे बंद करण्यावर भर देण्यात आला आहे. शेतीविषयक कामे, सार्वजनिक व खासगी वाहतूक सुरळीतपणे सुरूच राहील, मात्र खासगी कार्यालये, उपाहारगृहे, चित्रपटगृहे, गर्दीची ठिकाणी बंद राहतील. आठवड्याच्या शेवटी म्हणजे शुक्रवार रात्री ते सोमवारी सकाळ असा दोन दिवसांचा संपूर्ण लॉकडाऊन लावण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.