JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / कोरोनामुळे मुंबईत नियम आणखी कडक, पाळले नाहीतर होईल गुन्हा दाखल

कोरोनामुळे मुंबईत नियम आणखी कडक, पाळले नाहीतर होईल गुन्हा दाखल

याच परिपत्रकाप्रमाणे मुंबईमध्ये इतर विभागातही याच प्रमाणे अंमलबजावणी केली जाऊ शकते.

जाहिरात

प्रातिनिधिक फोटो

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 10 एप्रिल : मुंबईमध्ये कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाउन करण्यात आले. मात्र, त्यानंतरही लोकं भाजी मार्केटमध्ये गर्दी करत आहेत. या गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी पालिकेच्या घाटकोपर विभागात आठवड्यातून 2 दिवस भाजी विक्रीची परवानगी देण्यात आली आहे. मुंबईत रोज नव्याने कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. मुंबईत आतापर्यंत कोरोनाचे एकूण 775 रुग्ण आढळून आले आहेत. 54 जणांचा मृत्यू झाला असून 65 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. हेही वाचा - ‘मौत सें आंख मिलाने की जरूरत क्या है?’ हा VIDEO एकदा पाहाच मुंबईमध्ये रोज रुग्ण आढळून येत असल्याने लॉकडाउन करण्यात आला आहे. लॉकडाउन असला तरी नागरिक रोज भाजी घेण्यासाठी गर्दी करत होते. नागरिकांची गर्दी कमी करता यावी म्हणून पालिकेच्या घाटकोपर येथील एन विभागाने एक परिपत्रक काढले आहे. त्यानुसार एन विभाग कार्यालयाच्या हद्दीत येणाऱ्या पंत नगर, पार्क साईट, घाटकोपर, टिळक नगर या चार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नगरसेवक आणि व्यापारी यांची एक बैठक घेण्यात आली. या बैठकीत फक्त सोमवार आणि गुरुवार याच दिवशी सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत भाजी आणि फळ विक्री करता येणार आहे. इतर दिवशी भाजी किंवा फळ विकणारा आणि विकत घेणारा या दोघांवर सरसकट साथ नियंत्रण कायद्यानुसार गुन्हा दाखल केला जाणार आहे. हेही वाचा - बॉलिवूडमध्ये येण्याआधी पैसे कमावण्यासाठी सोनाक्षी सिन्हा करायची हे काम! याच परिपत्रकाप्रमाणे मुंबईमध्ये इतर विभागातही याच प्रमाणे अंमलबजावणी केली जाऊ शकते. धारावीत आणखी एका कोरोनाग्रस्ताचा मृत्यू दरम्यान, गुरुवारपर्यंत धारावीत आणखी एका कोरोनाग्रस्ताचा मृत्यू झाला आहे. धारावीत आतापर्यंत हा तिसरा कोरोनाबळी आहे. केईएम रुग्णालयात दाखल असलेल्या 70 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. ती धारावीच्या कल्याणवाडी परिसरात राहात असे. मुंबईत वरळी, प्रभादेवीनंतर आता धारावी Coronavirus चा हॉटस्पॉट सर्वांत धोकादायक ठरत आहे. आशियातली सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून ओळख असलेल्या धारावीत दाटीवाटीच्या घरांमुळे हा विषाणू वेगाने पसरत आहे. मार्चच्या शेवटी धारावीत पहिला रुग्ण सापडल्याची बातमी आली होती. आता धारावीत 14 कोरोनारुग्ण आहेत. आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. धारावीत रेड झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. 10 भागांमध्ये भाजीविक्रीसुद्धा बंद आहे. ये-जा करणारे रस्ते पूर्णपणे बंद करण्यात आले आहेत. संपादन - सचिन साळवे

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या