JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेस मंत्र्याचे नाव चर्चेत, पण मंत्रिपद सोडण्यास नकार!

विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेस मंत्र्याचे नाव चर्चेत, पण मंत्रिपद सोडण्यास नकार!

विधानसभा अध्यक्षपदाच्या उमेदवाराबाबत काँग्रेस पक्षाकडून संग्राम थोपटे, सुरेश वरपूडकर, अमिन पटेल यांच्या नावाची चर्चा आहे. तर

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 08 मार्च :  विधानसभेच्या अध्यक्षपदाच्या (Assembly Speaker) निवडणुकीबद्दल काँग्रेसमध्ये (Congress) हालचालींना वेग आला आहे. अध्यक्षपदासाठी निवडणूक घ्यावी अशी काँग्रेसची मागणी आहे. तर अध्यक्षपदासाठी ऊर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांचे नाव समोर आले आहे. पण, ऊर्जामंत्रिपद सोडण्यास राऊत यांनी नाकार दिल्याचे कळत आहे. नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपद सोडल्यामुळे रिक्त झालेल्या जागेच्या निवडीबद्दल पेच निर्माण झाला आहे. आज अधिवेशनात निवडणुकीबद्दल नोटीस काढण्यात यावी अशी मागणी काँग्रेसने केली आहे. IPL 2021 : आयपीएलच्या या मोसमात 4 मोठे बदल, कोणाला फायदा होणार? विधानसभा अध्यक्षपदाच्या उमेदवाराबाबत काँग्रेस पक्षाकडून संग्राम थोपटे, सुरेश वरपूडकर, अमिन पटेल यांच्या नावाची चर्चा आहे. तर अध्यक्षपदासाठी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या नावाचा ही विचार सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आग लागलेल्या उसाच्या फडात शेळ्यांना वाचवायला गेले, पण परत आलेच नाही! नितीन राऊत मात्र अध्यक्षपद निवडणूक लढवण्यास इच्छुक नाहीत. मंत्रिपद कायम ठेवावे यासाठी राऊत आग्रही असल्याची माहिती आहे. दरम्यान, विधानसभा अध्यक्षपदावर निवडणूक घ्यायची का नाही, यावर दोन मतप्रवाह सध्या दिसत आहेत. सत्ताधारी बाकावरून महाविकास आघाडीचे प्रमुख नेते हे विधानसभा अध्यक्ष निवडणूक घेण्याबबत फारसे अनुकूल नाहीत. राज्यातील मंत्री कोरोना रुग्ण झाले आहेत. अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे, आरोग्य मंत्री राजेश टोपे, शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू, अन्नधान्य पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण झाली आहे. संबंधित मंत्री स्वतंत्र विलगीकरणात आहे. त्यामुळे काही आमदार हे सभागृहात गैरहजर आहे.  त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये विधानसभा अध्यक्ष निवडणूक घेणे योग्य नाही असा सूर सत्ताधारी बाकावरचा आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या