अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीनंतर उद्धव ठाकरे हे अमित शहा यांची वेगळी भेट होण्याची देखील शक्यता
मुंबई, 25 सप्टेंबर : गेल्या काही दिवसांपासून राज्यात महाविकास आघाडी सरकारच्या (mva government) मंत्र्यांवर आरोपांचे सत्र सुरू आहे तर दुसरीकडे राज्यपाल (Governor ) आणि मुख्यमंत्र्यांमधील संघर्ष पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. अशा या वातावरणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackery) पुन्हा एकदा दिल्लीच्या (delhi) दौऱ्यावर जाणार आहे. उद्या म्हणजे रविवारी गृहमंत्री अमित शहांसोबत (amit shah) बैठक होणार असल्याची माहिती समोर आली आहे. (cm Uddhav Thackeray meet Amit Shah delhi ) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा दिल्ली दौरा निश्चित झाला आहे. नक्षलग्रस्त जिल्ह्याच्या राष्ट्रीय बैठकीचे आयोजन दिल्लीमध्ये करण्यात आले आहे. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहे.
या दौऱ्यासाठी उद्या रविवारी सकाळीच ते विमानाने दिल्ली जाणार आहे. सकाळी 10 वाजेच्या सुमारास ते बैठकीला हजर राहणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीनंतर उद्धव ठाकरे हे अमित शहा यांची वेगळी भेट होण्याची देखील शक्यता आहे.
याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिल्ली दौऱ्यावर गेले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अशोक चव्हाण यांच्यासह त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. या भेटीदरम्यान पंतप्रधान मोदी आणि उद्धव ठाकरे यांची बंददाराआड बैठक झाली होती. या बैठकीनंतर राज्यात शिवसेना आणि भाजपच्या युतीची चर्चा रंगली होती. आता पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दिल्लीच्या दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे. यावेळी अमित शहा यांच्यासोबत बैठक होणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे या भेटीला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे.