JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / ...आणि छगन भुजबळ थेट पोहोचले देवेंद्र फडणवीसांच्या घरी

...आणि छगन भुजबळ थेट पोहोचले देवेंद्र फडणवीसांच्या घरी

Chhagan Bhujbal meets Devendra Fadnavis: राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी आज विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 15 जुलै: राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे सातत्याने सत्ताधारी महाविकास आघाडी **(Mahavikas Aghadi Government)**वर टीका करत असतात. तर सत्ताधारी विरोधकांचे आरोप खोडून काढत असतात. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपाचा सिलसिला सुरूच असतो. मात्र, आज एक वेगळेच चित्र पहायला मिळाले. राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी आज विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. छगन भुजबळ यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या सागर (Sagar) या निवासस्थानी सकाळी भेट घेतली. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून ही भेट घेतली आहे. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यास संदर्भात दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. यावेळी ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत सकारात्मक चर्चा झाली. छगन भुजबळांसोबत माजी खासदार समीर भुजबळ देखील होते.

संबंधित बातम्या

देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, मी या प्रश्नात संपूर्ण मदत करीन. हा प्रश्न राज्यातच सुटण्यासारखा आहे. त्यामुळे तीच भूमिका जाणून घेण्यासाठी भुजबळ यांनी आज भेट घेतली. केंद्राकडे जाण्याचा विषय चर्चेत आला नाही. भुजबळांनी केली होती विनंती देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी आरक्षणाच संपूर्ण श्रेय घ्यावं पण ओबीसी आरक्षणाचा डाटा मिळवण्यासाठी प्रयत्न करावे, ही माझी विनंती आहे अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी काही दिवसांपूर्वी दिली होती. 5 वर्ष भाजपा सरकारच्या हातात ओबीसी विषय होता मात्र काहीही तुम्ही केलं नाही. भाजपा सरकारने डाटा मिळवण्याचा प्रयत्न केला मात्र केंद्र सरकारने डाटा दिला नाही आणि आता तुम्ही म्हणताय 4 महिन्यांत करता अस म्हणत भुजबळांनी फडणवीसांना टोलाही लगावला होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या