JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / Mumbai : चार्जिंग पॉईंट ते मेकअप बॉक्स! 'या' रिक्षातील सुविधा पाहून बसणार नाही विश्वास, Video

Mumbai : चार्जिंग पॉईंट ते मेकअप बॉक्स! 'या' रिक्षातील सुविधा पाहून बसणार नाही विश्वास, Video

Auto Rikshaw : एक भन्नाट ऑटो रिक्षा सध्या मुंबईच्या रस्त्यावर धावत आहे. या रिक्षामधील सुविधा पाहून तुमचा डोळ्यांना विश्वास बसणार नाही.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 1 फेब्रुवारी : मुंबईकर शहरामध्ये प्रवास करण्यासाठी लोकल, बस, ऑटो रिक्षाचा वापर करतात. मुंबईतील काही ऑटो रिक्षा चालक ग्राहकांचा प्रवास सुखाचा होण्यासाठी काही सोयी करतात. याच पद्धतीची एक भन्नाट रिक्षा सध्या मुंबईच्या रस्त्यावर धावत आहे. या रिक्षामध्ये मुंबईकरांसाठी अनेक सुविधा उपलब्ध आहेत. काय आहे खासियत? तुम्ही कुर्ला, अंधेरी, वांद्रे या भागात फिरत असाल तर कदाचित तुम्ही ही रिक्षा पाहिली असेल. या रिक्षामध्ये फोन चार्ज करण्यासाठी चार्जिंग पॉईंट, डेकस्टॉप मॉनिटर, पिण्यासाठी शुद्ध पाणी, हात धुण्यासाठी वॉश बेसिन यासारख्या सुविधा आहेत. सत्यवान गीते यांची ही रिक्षा आहे. कुर्ला पश्चिम भागात राहणारे गीते हे कलाकार आहेत. आपली रिक्षा आणखी सुंदर कशी करता येईल? या रिक्षात काय बदल करता येतील? याबाबत त्यांच्या डोक्यात सतत विचार सुरू असतो. विशेष म्हणजे हे फक्त रिक्षाला सुंदर बनवत नाहीत तर त्यावर काही सामाजिक संदेशही लिहितात. या सामाजिक संदेशातून मुंबईकरांमध्ये जागृती करण्याचं काम गीते करत आहेत. प्रेग्नेंट महिलांच्या मदतीला धावणारा रिक्षावाला भाऊ, शिवरायांच्या सच्च्या मावळ्याचं होतंय कौतुक, Video कशी सुचली कल्पना? सत्यवान गीते सांगतात की, ‘मी 1996 पासून मुंबईत रिक्षा चालवतोय. मी या लाईनमध्ये आलो त्यावेळी सुरुवातीला इतरांसारखाच रांगेत उभा असे. भाडी मिळायची नाहीत. घरची परिस्थिती बेताची होती. शिक्षण कमी असल्यानं जॉब तरी काय करणार हा प्रश्न होता. पण, मी उत्तम ड्रायव्हर होतो. त्यामुळे इतर काही करण्यापेक्षा आपल्या रिक्षामध्येच वेगळे प्रयोग करण्याचं मी ठरवलं.

रिक्षा सजवण्यासाठी खर्च हा येतोच. मुंबईत तर प्रत्येक खर्च जपून करावा लागतो. मी स्वत: कलाकार असल्यानं ही सजावट अन्य कारागिराकडून न करता स्वत:च केली. मी रिक्षात सुरूवातीला रेडिमेड लॉन म्हणून ओळखले जाणारे हिरव्या रंगाचे कार्पेट बसवले. त्यानंतर गालिचा बसवला. त्यानंतर हळूहळू एकेक गोष्टी वाढवत गेलो. आता मी रिक्षामध्ये कुंड्याही ठेवल्या आहेत. त्यामधील झाडांना फुलं येतात. ती पाहून रिक्षामध्ये बसलेला ग्राहक प्रसन्न होतो.’

प्रथमोपचारपेटी ते मेकअप बॉक्स आपण अनेकदा धावपळीत रिक्षा पकडतो. त्यामुळे रिक्षात बसल्यावर चांगलाच घाम येतो. पण, सत्यवान यांच्या रिक्षात तुम्हाला गार वाटेल. त्यांनी रिक्षामध्ये झाडं लावली आहेत. त्याचसोबत पंखाही बसवलाय. सर्व धावपळीत तुम्हाला काही लागलं असेल तर प्रथमोपचाराची पेटीही आहे. इतकंच नाही तर अनेक महिलांचा, मुलींना मेकअप करण्यास वेळ मिळाला नाही तर या रिक्षात बसून तुम्ही आरामात मेकअप करू शकता. यासाठी इथं मेकअप बॉक्स आणि आरसा आहे. त्याचबरोबर हात आणि तोंड धुण्यासाठी छोट बेसिनही रिक्षामध्येच गीते यांनी बसवलंय. Kolhapur : प्रवाशांना रोपं वाटणारा रिक्षा चालक, 22 हजार झाडांना दिलं आयुष्य! Video जनजागृतीसाठीही उपयोग मुंबईतील रिक्षा ड्रायव्हर म्हणजे एक प्रकारचा रायडरच असतो. प्रचंड ट्रॅफिकमधून गाड्यांना कट मारून रिक्षा काढणे ही त्यांची विशेष कला. त्यामुळे मुंबईत अनेक अपघात देखील घडत असतात.  मुंबईतल्या वाहन चालकांचे प्रबोधन करण्याचं अवघड काम गीते करतात. त्यांनी या रिक्षावर वाहतुकीचे नियम लिहिले आहेत.  हे नियम वाचून आणि रिक्षामधील सर्व प्रकारचे सोयी, त्याचं वेगळेपण पाहून प्रत्येक ग्राहक प्रसन्न होतो, असा अनुभव त्यांनी सांगितला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या