1 हजारात लसीकरण प्रमाणपत्र देण्याचा गोरखधंद या सायबर कॅफेमध्ये सुरू होता.
मुंबई, 07 जानेवारी : मुंबईमध्ये कोरोना (mumbai corona cases) आणि ओमायक्रॉनने उच्छाद मांडला आहे. कोरोनाची लाट रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणाला कामाला लागली आहे. पण दुसरीकडे धारावीमध्ये (dharavi) 1 हजार रुपयांमध्ये बनावट लसीकरण प्रमाणपत्र (fake COVID-19 vaccination certificates) देण्याचा प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी एका सायबर कॅफे चालकाला ताब्यात घेतले आहे. कोरोनाला रोखण्यासाठी लशीचे दोन डोस बंधनकारक करण्यात आले आहे. मॉल, सिनेमागृह आणि लोकल प्रवासासाठी लसीकरणाचे प्रमाणपत्र सोबत असणे बंधनकारक करण्यात आले आहे. पण धारावीमध्ये एका सायबर कॅफेमध्ये बनावट प्रमाणापत्र देण्यात येत असल्याचा प्रकार समोर आला आहे.
1 हजारात लसीकरण प्रमाणपत्र देण्याचा गोरखधंद या सायबर कॅफेमध्ये सुरू होता. सेकारन फ्रान्सिस नाडर असं या आरोपीचं नाव आहे. या तरुणाने बनावट कोविड प्रमाणपत्र तयार करून देत होता. याची गुप्त माहिती मिळताच पोलिसांनी त्याच्या कॅफेवर छापा टाकला आणि त्याला ताब्यात घेतले. ( ‘त्या’ किळसवाण्या कृत्यानंतर जावेद हबीबचं स्पष्टीकरण; Video पोस्ट करत म्हणाला… ) पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर सापळा रचला. त्यानंतर एक बनावट ग्राहक तयार करून सेकारन नाडरकडे पाठवण्यात आला. बनावट प्रमाणपत्र घेण्याचा व्यवहार झाला. त्यानंतर प्रमाणपत्र देण्यासाठी आला तर पोलिसांनी त्याला अटक केली. त्याने आतापर्यंत कुणा कुणाला प्रमाणपत्र वाटप केले, याचा तपास पोलीस करत आहे. या प्रकरणामुळे मुंबईत खळबळ उडाली आहे.