मुंबई, 16 जून : देशाची आर्थिक आणि राज्याची राजधानी मुंबईला कोरोनाचा विळखा बसला आहे. सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण हे मुंबईत आढळले आहे. त्यामुळेच भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ‘आपण सध्या मुंबई येण्याचे अजिबात धाडस करू शकत नाही’ असं स्पष्ट केलं आहे. मुंबईत कोरोनाची परिस्थितीत दिवसेंदिवस भीषण होत चालली आहे. दररोज कोरोनाबाधित रुग्णांची नवी आकडेवारी समोर येत आहे. कोरोनाच्या परिस्थितीवर एएनआय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत नितीन गडकरी यांनी मुंबई शहराबद्दल भीती व्यक्त केली आहे.
‘मला जर आता मुंबईत काही कार्यक्रमासाठी यायचे असेल तर सध्याची परिस्थिती पाहिली तर मी मुंबई येण्याचे कोणतेही धाडस करणार नाही’ असं मत गडकरी यांनी व्यक्त केलं. त्याचबरोबर, मुंबईसह महाराष्ट्रात कोरोनाची परिस्थिती ही चिंताजनक आहे. पण मला वाटते वेळ नक्की बदलले, असा विश्वासही गडकरी यांनी व्यक्त केला. राज्यातल्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 110744 वर दरम्यान, आतापर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार, राज्यात एका दिवशी 5 हजारांवर रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. बरं होणाऱ्या रुग्णांची संख्या अॅक्टिव्ह रुग्णसंख्येपेक्षा पहिल्यांदाच वाढली आहे. पण नव्या रुग्णांची संख्या वाढ होण्याचं प्रमाण कायम आहे. मुंबई महानगरपालिकेच्या क्षेत्रात बाधित रुग्णांची संख्या 59,293 वर पोहोचली आहे. यात 30,125 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर आतापर्यंत 2250 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या 26, 910 ॲक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहे. लडाखच्या गॅल्वान खोऱ्यात भारतीय-चिनी सैन्यात चकमक, कर्नलसह दोन जवान शहीद एकीकडे बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असली तरी 178 जणांचा आज राज्यात कोरोनामुळे मृत्यू नोंदवला गेला आहे. राज्यात अडीच हजारांपेक्षा जास्त म्हणजे तब्बल 2786 रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यातल्या एकूण रुग्णांची संख्या 110744 वर पोहोचली आहे. गेले काही दिवस राज्यात सातत्याने अडीच ते तीन हजारांच्या जवळपास रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे लवकरच राज्यातला आकडा भराभर वाढतो आहे. राज्यात आतापर्यंत 4128 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. संपादन- सचिन साळवे