JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / 'काश्मीरमध्येही फिल्मसिटी उभारा'; शिवसेनेने भाजपला पुन्हा डिवचलं

'काश्मीरमध्येही फिल्मसिटी उभारा'; शिवसेनेने भाजपला पुन्हा डिवचलं

‘मात्र गेल्या काही महिन्यांपासून या मायानगरीस बदनाम करण्याचे, तिचे खच्चीकरण करण्याचे, त्यात काम करणाऱ्या प्रमुख मंडळींवर दाबदबाव टाकण्याचे प्रयोग सुरु झाले आहेत. '

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 25 सप्टेंबर : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी युपीमध्ये देशातील सर्वात मोठी फिल्मसिटी उभारणार असल्याचे म्हटल्यानंतर देशात एकच चर्चा सुरू झाली आहे. योगी आदित्यनाथ यांच्या वक्तव्यानंतर आज 25 सप्टेंबरच्या सामना अग्रलेखातून त्यांच्या वक्तव्याचा समाचार घेण्यात आला आहे. तर काश्मिरमध्येही फिल्मसिटी उभारा असा खोचक सल्ला सामना अग्रलेखातून योगी आदित्यनाथांना देण्यात आला आहे. लॉकडाऊनमध्ये चित्रपटांचे प्रदर्शन बंद असताना योगींनी उत्तर प्रदेशात नव्या फिल्मसिटीची संकल्पना मांडली आहेत. यावर शिवसेनेने सामना अग्रलेखातून भाजपचा समाचार घेतला आहे. खरं तर 370 कलम हटविल्यानंतर केंद्राने काश्मिरात अशा एखाद्या फिल्मसिटीची योजना राबवायला हवी. एकेकाळी आमच्या सिनेजगता चित्रीकरण करण्यासाठी काश्मीर, शिमला, मनाली, शिलाँग अशा भागात जात होते. तेथेही भव्य फिल्मसिटी उभारता येईल. हे ही वाचा- मुंबईतील प्रवेश महागला; 1 ऑक्टोबरपासून टोलदरात मोठी वाढ मुंबई म्हणजे चित्रपटसृष्टीची जन्मभूमी किंवा कर्मभूमी हे ठसवण्यात गेल्या शंभर वर्षात अनेकांचे योगदान आहे. कोल्हापुरात मराठी सिनेमे तर मुंबईत हिंदी सिनेमे वर्षानुवर्ष तयार होत आहेत. मुंबईस जी चमक-धमक मिळत असते त्यात मायानगरीचे अस्तित्व हे कारण आहेच. मात्र गेल्या काही महिन्यांपासून या मायानगरीस बदनाम करण्याचे, तिचे खच्चीकरण करण्याचे, त्यात काम करणाऱ्या प्रमुख मंडळींवर दाबदबाव टाकण्याचे प्रयोग सुरु झाले आहेत. जणू काही सिनेउद्योगाने व त्यात काम करणाऱ्या चमकदार मंडळींनी मुंबई सोडून जावे, असे वातावरण निर्माण केले जात आहे का, अशी शंका येऊ लागली आहे”, असंही सामना अग्रलेखात नमूक करण्यात आले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या