JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / BREAKING : मुंबईमध्ये ओमायक्रॉनचा उद्रेक, एकाच दिवसात 27 जण आढळले पॉझिटिव्ह

BREAKING : मुंबईमध्ये ओमायक्रॉनचा उद्रेक, एकाच दिवसात 27 जण आढळले पॉझिटिव्ह

मुंबईमध्ये आढळलेल्या 27 जणांमध्ये 3 लहान मुलांचा समावेश आहे. हे सर्व 27 जण परदेशातून आले आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 26 डिसेंबर : कोरोनाचा (corona) नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन (Omicron Variant) राज्यभरात हातपाय पसरत आहे. मुंबईमध्ये ओमायक्रॉनचे हॉटस्पॉट ठरले आहे. आज मुंबईत (mumbai) एकाच दिवसात 27 रुग्ण आढळले आहे. तर ठाण्यात 2, पुणे (pune) ग्रामीण आणि अकोल्यात (akola) 1 रुग्ण आढळला आहे. तर राज्यात ओमायक्रॉनबाधित रुग्णांची संख्या तब्बल 141 वर पोहोचली आहे. मुंबई महापालिकेकडून शहरातील कोरोना परिस्थिती आणि रुग्णांबद्दल माहिती दिली आहे. राज्यात आज एकूण ३१ ओमायक्रॉनचे रुग्ण आढळले आहे. मुंबईमध्ये आज एकाच दिवसात ओमायक्रॉनचे 27 रुग्ण आढळले आहे.  तर ठाण्यात 2 तर पुणे ग्रामीण 1 आणि अकोल्यामध्ये 1 रुग्ण आढळला आहे. आतापर्यंत राज्यात 141 जण ओमायक्रोनने बाधित आढळले आहे. (हेही वाचा- या’ लोकांना देणार कोरोना लशीचा बुस्टर डोस; पंतप्रधान मोदींचा मोठा निर्णय ) मुंबईमध्ये आढळलेल्या 27 जणांमध्ये 3 लहान मुलांचा समावेश आहे. हे सर्व 27 जण परदेशातून आले आहेत.यातील १५ जण हे मुंबई बाहेरील रहिवासी आहे. २१ रुग्णांची मुंबई विमातळावर तपासणी करण्यात आली होती. रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर सर्व रुग्णांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (हेही वाचा- आता लहान मुलांनाही मिळणार कोरोना लस; ‘भारत बायोटेक’ला मिळाला हिरवा कंदील ) या 27 जणांपैकी 8 जणांना कोविडची कोणतीही लस घेतली नाही. तर ७ वर्ष, ८ वर्ष आणि ९ वर्षांच्या तीन लहान मुलींना सुद्धा ओमायक्रॉनची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.  तर दुसरीकडे राज्यात 1648 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहे तर 17 जणांचा मृत्यू झाला आहे. अकोल्यातही ओमायक्रॉनचा शिरकाव दरम्यान, एकीकडे विदर्भात ओमायक्रॉनने शिरकाव केला आहे. तर आज अकोला इथं 18 डिसेंबर रोजी दाखल झालेल्या एका कोरोनाबाधित महिलेची ओमायक्रॉन चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने स्पष्ट केले आहे. ही महिला दुबई येथून प्रवास करून आली होती. सद्यस्थितीत या रुग्णाची प्रकृती उत्तम असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या