वाशिम न्यायालयाने मंत्री नवाब मलिक यांना आपले म्हणणे मांडण्यासाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहे...
मुंबई, 22 नोव्हेंबर : मुंबई ड्रग्स पार्टी प्रकरणी आर्यन खानला (aryan khan) अटकेच्या कारवाईनंतर राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (nawab malik) यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे (sameer wankhede) यांच्यावर एकापाठोपाठ आरोपांची मालिका सुरू केली आहे. त्यामुळे समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी मलिक यांच्याविरोधात हायकोर्टात (Bombay High Court ) धाव घेतली होती. पण, हायकोर्टाने याचिकाच फेटाळून लावत वानखेडेंना दणका दिला आहे. नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांनी आर्यन खानला केलेली अटक ही बनावट असल्याचं सांगत अनेक पुरावे सादर केले होते. एवढंच नाहीतर समीर वानखेडे हे मुस्लिम असल्याचा दावाच करत त्यांनी अनेक फोटो आणि कागदपत्र ट्वीट केले होते. त्यामुळे वानखेडे कुटुंबीयांनी बचावासाठी कोर्टात धाव घेतली होती. समीर वानखेडेंचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांना मुंबई हायकोर्टात याची दाखल केली होती. पण, आज कोर्टाने त्यांना दिलासा दिला नाही. नवाब मलिक यांना समीर वानखेडे व त्यांच्या कुटुंबीयांविरोधात काहीही आक्षेपार्ह बोलण्यास मनाई करण्यास मुंबई हायकोर्टाने स्पष्ट नकार दिला आहे. मात्र, नवाब मलिक यांना यापुढे वाजवी पद्धतीने माहितीची खातरजमा करूनच ट्विट करण्याचे हायकोर्टाने निर्देश दिले आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीत तब्बल 606 कोटी शिल्लक, 25 टक्केच निधी वापरला! ज्ञानदेव वानखेडे यांची याचिका हायकोर्टाने फेटाळून लावल्यानंतर नवाब मलिक यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘सत्यमेव जयते म्हणत चुकीच्या बाबी विरोधातला आपला लढा सुरूच राहणार’, असं मलिक यांनी आता ठणकावून सांगितलं आहे.
त्यामुळे याही पुढे आता नवाब मलिक वानखेडे कुटुंबावर आरोप करू शकता हे स्पष्ट झालं आहे. त्यामुळे समीर वानखेडे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.