JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, कोरोनाला रोखण्यासाठी निरोगी लोकांना पालिका देणार 'हे' औषध

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, कोरोनाला रोखण्यासाठी निरोगी लोकांना पालिका देणार 'हे' औषध

मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं हे औषध धारावी आणि वरळी कोळीवाड्यातील नागरिकांना देण्यात येणार आहे.

जाहिरात

कोरोना व्हायरसवर जगभर संशोधन सुरू आहे. त्यावर अजुन औषध सापडलेलं नाही. मात्र त्याच्या लक्षणांविषयी महत्त्वाची माहिती आता बाहेर आली आहे.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 12 मे : कोरोनाचा प्रादर्भाव कमी करण्यासाठी अद्याप कोणतीही लस किंवा औषध उपलब्ध नाही आहे. असे असले तरी, डॉक्टर आणि शास्त्रज्ञ सध्या रुग्णांची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यावर भर देत आहेत. देशातील मुंबई हे कोरोनाचे सर्वात मोठे हॉटस्पॉट झाले आहे. त्यामुळं मुंबईकरांची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी महापालिकेनं एक खास औषध देण्याचा निर्णय घेतला आहे. निरोगी लोकांना आर्सेनिक अल्बम या होमिओपथिक गोळ्या देण्यात येणार आहे. मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं हे औषध धारावी आणि वरळी कोळीवाड्यातील नागरिकांना देण्यात येणार आहे. सध्या धारावी आणि वरळी हे दोन्ही हॉटस्पॉट क्षेत्र आहेत. त्यामुळं येथील निरोगी नागरिकांच्या रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी हे औषध देण्यात येणार आहे. याआधी नागरिकांना हायड्रोक्लोरोक्विन हे औषध देण्यात येणार होते, मात्र त्याचे शरीरावर होणारे विपरित परिणाम लक्षात घेता, हा निर्णय रद्द करण्याता आला. वाचा- मुंबई, पुणे सोडून राज्यात या तीन ठिकाणी झाला कोरोनाचा उद्रेक, पाहा अपडेट महापालिकेकडे आरजू स्वाभीमान नागरी समितीनं अर्सेनिक अल्बत 30 या गोळ्या नागरिकांना तसेच हॉटस्पॉट परिसरातील वृद्धांना देण्याची परवानगी मागितली होती. त्यानुसार आता या औषधाचे वितरण धारावी आणि वरळी या क्षेत्रांमध्ये करण्यात येणार आहे. आजपासून धारावी, माहिम दादर परिसरात या औषधांचे वितरण करण्यात येणार आहे. वाचा- ‘मुंबईत राहिलो तर भुकेनं मरू’; रिक्षात संसार जमा करुन चालकांनी धरली गावाची वाट दरम्यान, पालिकेने या औषधाचे वितरण करण्याची परवानगी दिली असली तरी, हे औषध घ्यायचे की नाही हा निर्णय नागरिकांचा असणार आहे. काही दिवस पालिकेच्या आरोग्य विभागाकडून पाहणी करण्यात येणार आहे. मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वाढती मुंबईत सोमवारी तब्बल 791 रुग्णांची वाढ झाली. तर 587 रुग्णांना डिस्चार्ज दिला गेला. सोमवारी 36 पैकी 20 मृत्यू मुंबईतले आहेत. मुंबईतल्या रुग्णांची संख्या 14 हजार 355वर गेली आहे. तर मृत्यूचा आकडा 528वर गेला होता. तर, राज्यात सोमवारी 1230 नवे रुग्ण आढळून आले. तर 36 जणांता मृत्यू झाला. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या 23 हजारहून अधिक झाली आहे. वाचा- मुंबईला बदनाम करण्याचा कट रचला जातोय, जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या