JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / सावरकरांच्या मुद्यावर भाजप आक्रमक, शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न

सावरकरांच्या मुद्यावर भाजप आक्रमक, शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न

सावरकर यांनी इंग्रजांची माफी मागितली होती. ते माफीवीर आहेत अशी टीका राहुल गांधी यांनी केली होती.

जाहिरात

Pune: Maharashtra Chief Minister Uddhav Thackeray addresses a gathering at Shivneri Fort, the birthplace of legendary Maratha warrior Chhatrapati Shivaji Maharaj, on the occasion of his birth anniversary, in Pune, Wednesday, Feb. 19, 2020. (PTI Photo) (PTI2_19_2020_000055B)

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 26 फेब्रुवारी : विधिमंडळ अधिवेशनात दोन्ही सभागृहांमध्ये आज स्वातंत्र्यावीर सावरकरांचा मुद्दा चांगलाच गाजण्याची शक्यता आहे. आज  (26 फेब्रुवारी )सावरकारांची पुण्यतिथी आहे. त्या निमित्ताने भाजप त्यांच्या गौरवाचा प्रस्ताव आणून शिवसेनेची कोंडी करण्याच्या प्रयत्नात आहे. कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत हा प्रस्ताव विधिमंडळात आणण्याचा आग्रह भाजपनं केला होता. मात्र सत्ताधारी पक्षांनी त्याला नकार दिल्याने भाजपने त्यांच्यावर टीका केली होती. मंगळवारी आझाद मैदानावरच्या भाषणातही विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना सत्तेच्या लोभापायी सावरकरांचा अपमान सहन करतेय अशी टीका केली होती. भाजपच्या टीकेला शिवसेना कसं उत्तर देणार हे सभागृहात स्पष्ट होणार आहे. सावरकरांच्या गौरवाच्या मुद्यावर प्रस्ताव आणण्यास काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा विरोध आहे. त्यामुळे या विषयावरून महाआघाडीत मतभेद निर्माण करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. शिवसेनेने आत्तापर्यंत या प्रकरणावरुन तरी फारशी दाद भाजपला दिली नाहीये. सावरकर हा शिवसेनेच्याही जिव्हाळ्याचा विषय आहे. खासदार संजय राऊत यांनी यावरून राहुल गांधी यांच्यावर टीकाही केली होती. पुण्यातील सहकारी बॅंक गैरव्यवहार प्रकरणी राष्ट्रवादीच्या आमदारासह चौघांना अटक सावरकरांविरुद्ध आक्षेपार्ह विधानं करणाऱ्यांना तुरुगात पाठवलं पाहिजे अशी टीका संजय राऊतांनी केली होती. त्यावरून काँग्रेस आणि शिवसेनेत आरोप-प्रत्यारोपही झाले होते. सावरकर यांनी इंग्रजांची माफी मागितली होती. ते माफीवीर आहेत अशी टीका राहुल गांधी यांनी केली होती. तर महाराष्ट्र काँग्रेसचं मुखपत्र असलेल्या ‘शिदोरी’ या मुख्यमंत्रामध्ये सावकरांवर एक लेख प्रसिद्ध झाला होता. त्यावरूनही वादळ निर्माण झालं होतं.

तुकाराम मुंडेंचा दणका, सराईत गँगस्टरचा आलिशान बंगला अखेर जमीनदोस्त

हा लेख आक्षेपार्ह असून त्यात सावकरांबद्दल अत्यंत खालच्या पातळीवरची हीन टीका केली आहे असा आरोप माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. त्यामुळे शिवसेना भाजपच्या या रणनीतीला कसं उत्तर देतं यावर महाघाडीतलं समिकरण स्पष्ट होणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या