JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / इंधनाच्या दराबद्दल विरोधकांनी केंद्राला पत्र देण्याची हिंमत दाखवावी, अजित पवारांचा भाजपला टोला

इंधनाच्या दराबद्दल विरोधकांनी केंद्राला पत्र देण्याची हिंमत दाखवावी, अजित पवारांचा भाजपला टोला

‘मुंबई उत्त्पन्न देणारी राजधानी आहे. त्याचा विचार केला म्हणून आकस करण्याचा कारण नाही’

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 10 मार्च : अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा (Maharashtra Budget 2021) आज समारोप होणार आहे. राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी अर्थसंकल्पावर आपली बाजू मांडली. ‘इंधन दरवाढीत सूट देण्याची मागणी होत आहे. पण केंद्राकडे पेट्रोल डिझेल दरवाढ कमी करण्याबाबत पत्र विरोधी पक्ष नेत्यांनी हिंमत दाखवावी’ असा टोला अजित पवार यांनी लगावला. अजित पवार यांनी अर्थसंकल्पावर निवेदन सादर करत भाजप नेत्यांवर जोरदार हल्लाबोल केला. ‘अर्थसंकल्प हा कोणत्या चष्म्यातून बघितला जातो हे महत्वाचे आहे. कोरोनाचा आर्थिक संकट काळ असताना बजेट हा देऊन सर्व सावरण्याचा प्रयत्न केला जातोय. राजकोषीय तूट जीडीपी तुलनेने मोठी आहे. कोरोना काळात राजकोषीय तूट यावर चर्चा करणे चुकीच आहे’, असं अजित पवार यांनी स्पष्ट केले.

मराठा आरक्षण कोणत्याही पक्षाचे मालकीचे नाही, अशोक चव्हाणांनी फडणवीसांना फटकारले

‘शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी झालेली नाही. मात्र आता पर्यंत ३१,२२,६८४ शेतकर्यांना कर्जमाफीचा लाभ घेता आला.  शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्ज द्यायचे ही आमची भूमिका आहे. नियमित कर्ज परत फेड करणारे शेतकरी यांना ५० हजार मदत करणार’ असंही पवारांनी सांगितलं. ‘देशामध्ये 10 महिन्यात 10,113 हजार कंपन्या बंद झाल्या. या पैकी 1279 कंपन्या एकट्या महाराष्ट्रील बंद पडल्या आहेत’, अशी माहिती अजित पवारांनी दिली. ‘सरकारने किती ही मदत केली की कमी वाटते पण केंद्र सरकारने, पंतप्रधान मोदींनी मदत केली की, विरोधकांना जास्त वाटते. त्यांनीही शेतकऱ्यांना 6 हजार मदत दिली आणि आम्हीही 6 हजार दिली, असा टोलाही  अजित पवारांनी लगावला. ‘महिलांच्या नावे घर घेण्याची योजना आम्ही सुरू केली आहे. पण श्रीमंत घरातील महिला घर खरेदी करत असतील तर मुद्रांक शुल्क सवलत मिळणार नाही, त्यांना काही मर्यादा यात घालून देणार आहे’, असंही अजित पवारांनी स्पष्ट केली.

दहा वर्षांपूर्वी राज्यसभेत मंजूर झालं महिला आरक्षण विधेयक, लोकसभेत आजही अडकून

‘काही आमदार कोरोना टेस्ट रिपोर्ट चुकीचे दाखवले जाते, त्यावर सभापती म्हणून कारवाई केली पाहिजे. गोपीचंद पडळकर आणि प्रशांत परिचारक कोरोना रिपोर्टवरून विधान परिषदेत गोंधळ झाला होता तो मुद्दा घेत अजित पवार यांची नाव न घेता आमदारावर कारवाईची मागणी केली. ‘केंद्र सरकारला नोटा छापण्याचा अधिकार आहे पण राज्य सरकरला नाही, केंद्राने राज्य सरकारचा विचार केला पाहिजे, सरकार कोणाचे हे विचार करून चालणार नाही. केंद्राकडे पेट्रोल डिझेल दरवाढ कमी करण्याबाबत पत्र विरोधी पक्ष नेत्यांनी हिंमत दाखवावी, असा टोलाही अजित पवार यांनी लगावला. ‘मुंबई केंद्रीत अर्थसंकल्प म्हणून या बजेटवर टीका काही विरोधक करतात, मुंबई उत्त्पन्न देणारी राजधानी आहे. त्याचा विचार केला म्हणून आकस करण्याचा कारण नाही, असं म्हणत अजित पवारांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या