मुंबई, 30 जून : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी काल रात्री राज्याच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर भाजप आणि शिंदे गटाचा सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री होण्याची शक्यता आहे. म्हणजे जवळपास अडीच वर्षांनंतर भाजप पुन्हा एकदा राज्यातील सत्ता काबीज करणार आहे. यानंतर मुंबई भाजपने (BJP Mumbai) एक ट्वीट करत आपलं पुढचं टार्गेटही सेट केलं आहे. मुंबई महापालिका हे भाजपचे पुढचं टार्गेट असणार आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुका (BMC Elections) काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. सर्वच पक्ष त्या दृष्टीने कामाला लागले आहेत. राज्याच्या सत्तासंघर्षात भाजपने बाजी मारल्यानंतर आता त्यांनी मुंबई महापालिकेकडे आपलं लक्ष वळवलं आहे. राज्यातील सत्तेचा मार्ग मोकळा झाल्यानंतर मुंबई भाजपने ट्वीट करत म्हटलं की, “यह तो झांकी है…. मुंबई महापालिका अभी बाकी है…!” या ट्वीटमध्ये उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस यांना टॅग करण्यात आलं आहे. Shiv Sena : अयोध्येत बाबराचे नामोनिशाण तर औरंगाबादचे नाव नष्ट केले विरोधकांकडे आता बोलायला काय राहिले?
उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात नव सरकारचा 1 जुलैला शपथविधी होण्याची शक्यता आहे. सुत्रांनी ही माहिती दिली आहे. उद्या भाजप सत्तास्थापनेचा दावा करणार आहे. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे दोन्ही नेते 1 जुलैला शपथ घेण्याची शक्यता आहे. उद्या हंगामी अध्यक्षांची निवड होणार असल्याची शक्यता आहे.