JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / भाजपचे नेते आशिष शेलार यांना कोरोनाची लागण, पदाधिकाऱ्यांना केले आवाहन

भाजपचे नेते आशिष शेलार यांना कोरोनाची लागण, पदाधिकाऱ्यांना केले आवाहन

खुद्द आशिष शेलार यांनीच आपल्याला कोरोनाची लागण झाली आहे, अशी माहिती ट्वीट करून दिली आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 14 एप्रिल : राज्यात कोरोनाबाधित (Corona) रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. सर्वसामान्यांपासून ते राजकीय नेते कोरोनाच्या कचाट्यात सापडले आहे. भाजपचे आमदार आशिष शेलार (Ashish Shelars corona positive) यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. भाजपचे फायरब्रँड नेते म्हणून ओळखले जाणारे आशिष शेलार यांचा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. खुद्द आशिष शेलार यांनीच आपल्याला कोरोनाची लागण झाली आहे, अशी माहिती ट्वीट करून दिली आहे.

माझी कोरोनाची चाचणी ही पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे वैद्यकीय डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुढील उपचार घेत आहे, अशी माहिती शेलार यांनी दिली. तसंच, माझ्या संपर्कात जे कुणी कार्यकर्ते, पदाधिकारी असतील त्यांनी योग्य ती वैद्यकीय काळजी घ्यावी, कोरोनाचे लक्षण जाणवल्यास चाचणी करून घ्यावी, असं आवाहनही आशिष शेलार यांनी केलं. कोरोनाने बेजार महाराष्ट्रापुढे आणखी एक संकट, शासकीय डॉक्टर जाणार संपावर! भाजपचे आमदार मंगलप्रसाद लोढा यांना सुद्धा कोरोनाची लागण झाली आहे. लोढा यांचा रिपोर्ट आज पॉझिटिव्ह आढळून आला आहे. भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करून ट्वीट करून लोढा यांना आरोग्याची काळजी घेण्यास सल्ला दिला होता.  राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 50 हजार पार! दरम्यान,राज्य सरकारकडून कोरोनाबाधित रुग्णांची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात आली आहे.  राज्यात गेल्या 24 तासांमध्ये 39,624 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे. आजपर्यंत एकूण 29,05,721कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले.  यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 81.21 एवढे झाले आहे. आज राज्यात 58,952 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तर 278 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.64 टक्के एवढा आहे. 6 बॉलमध्ये बदललं मॅचचं चित्र, थरारक लढतीमध्ये विराट कोहलीच्या टीमचा विजय आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 2,28,02,200 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 35,78,160 (15.86 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 34,55,206 व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत तर 28,494 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. राज्यात सध्या 6,12,070 रुग्ण ऍक्टीव्ह आहे. गेल्या तीन दिवसांपासून राज्यात 50 हजारांच्या पुढे रुग्ण आढळून आले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या