भाजपकडून पियूष गोयल यांच्या नावाची चर्चा सुरू होती. अखेरीस त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे. त्यापाठोपाठ अनिल बोंडे यांनाही संधी देण्यात आली
मुंबई, 29 मे : राज्यसभा निवडणुकीसाठी ( rajya sabha election 2022) भाजपकडून अखेर आपले पत्ते उघडण्यात आले आहे. भाजपकडून माजी रेल्वे मंत्री पियुष गोयल ( Piyush Goyal) आणि डॉ. अनिल बोंडे (anil bonde) यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपकडे तिसऱ्या जागेसाठी उमेदवार देणार अशी चर्चा होती, मात्र, तिसऱ्या जागेसाठी अजूनही सस्पेन्स कायम आहे. राज्यसभा निवडणुकीसाठी आता चुरस आणखी वाढली आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आपले उमेदवार निश्चित केल्यामुळे भाजपने आता आपले उमेदवार जाहीर केले आहे. भाजपकडून पियूष गोयल यांच्या नावाची चर्चा सुरू होती. अखेरीस त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे. त्यापाठोपाठ अनिल बोंडे यांनाही संधी देण्यात आली आहे. दरम्यान, तिसऱ्या जागेसाठीही भाजपने हालचाल सुरू केली होती. विनोद तावडे, हर्षवर्धन पाटील आणि धनंजय महाडिक यांच्या नावाची चर्चा आता रंगली आहे. विशेष म्हणजे, तिसऱ्या जागेसाठी भाजपला 13 मते कमी पडत आहे. पण, भाजपकडून तिसऱ्या जागेसाठी लागणाऱ्या मतांसाठी मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. ( ठाण्याचं कुटुंब सिक्किमला फिरायला गेलं, पण काळाचा घाला, कार दरीत कोसळली ) भाजपकडे 113 आमदारांचं संख्याबळ आहे. भाजपचे 106 आमदार, रासप 1, जनसुराज्य 1 आणि अपक्ष 5 आमदार अशा एकूण 113 आमदार भाजपकडे आहेत. राज्यसभेच्या एका जागेसाठी ४२ मतांची गरज आहे. भाजपला फक्त 13 मतांची गरज आहे. काय आहे संख्याबळ? सध्या महाविकास आघाडीकडे 169 आमदार आहेत. शिवसेना 55, राष्ट्रवादी 54, काँग्रेस 44, इतर पक्ष 8 आणि अपक्ष 8 असं महाविकास आघाडीकडे संख्याबळ आहे. तर भाजपकडे 113 आमदारांचं संख्याबळ आहे. भाजपचे 106 आमदार, रासप 1, जनसुराज्य 1 आणि अपक्ष 5 आमदार अशा एकूण 113 आमदार भाजपकडे आहेत. ( पावसाळ्यात व्हायरल, सर्दी, फ्लू सारखे आजार होतात? आहारात या गोष्टींचा समावेश करा ) राज्यसभेच्या एका जागेसाठी 42 मतांची गरज असते. महाविकास आघाडीकडे 169 आमदार आणि भाजपकडे 113 आमदार आहेत. संख्याबळानुसार शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा एक उमेदवार सहज राज्यसभेवर निवडून जाऊ शकतो. तर भाजपचे दोन उमेदवार राज्यसभेवर जाऊ शकतात. तिसरी जागा भाजपनं लढवल्यास फोडाफोडी करावी लागू शकते.