JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / शेम टू शेम, मुंबईच्या जुळ्या भावांना दहावीत एकसारखेच गुण, SSC परीक्षेत घवघवीत यश

शेम टू शेम, मुंबईच्या जुळ्या भावांना दहावीत एकसारखेच गुण, SSC परीक्षेत घवघवीत यश

भांडूपमधील जुळ्या भावांनी तर कमालच केली आहे. या जुळ्या भावांना दहावीच्या परीक्षेत सारखेच गुण मिळाले आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 17 जून : राज्यात दहावीचा ऑनलाईन निकाल (SSC Result) जाहीर झाला आहे. या निकालामुळे राज्यात आनंदाचे वातावरण आहे. कारण राज्याचा दहावीचा निकाल हा तब्बल 96.94 टक्के इतका लागला आहे. लाखो विद्यार्थ्यांना घवघवीत यश मिळालं आहे. विशेष म्हणजे भांडूपमधील (Bhandup) जुळ्या भावांनी तर कमालच केली आहे. या जुळ्या भावांना दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळालं आहे. त्यांना तब्बल 85 टक्क्यांपेक्षाही जास्त गुण मिळाले आहेत. महत्त्वाचं म्हणजे या दोन्ही भावांना अगदी सारखेच गुण मिळाले आहेत. त्यामुळे या जुळ्या भावांची संपूर्ण शहरात चर्चा सुरु आहे. मुंबईच्या भांडूप शहरात हे जुळे बंधू राहतात. या जुळ्या भावांचं सौरभ धनाजी ढगे आणि साहिल धनाजी ढगे असं नाव आहे. या दोघांनाही दहावीच्या परीक्षेत तब्बल 87 टक्के गुण मिळाले आहेत. त्यामुळे त्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे. विशेष म्हणजे या जुळ्या भावांना परीक्षेत सारखेच गुण मिळाल्याने अनेकांकडून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. खरंतर हा योगायोग आहे. पण या योगायोगाचं देखील त्यांच्या नातेवाईक, मित्रमंडळींना अप्रूप वाटत आहे. ( Live Video : मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात अनोळखी कार घुसली, मोठा अपघात टळला ) साहिल आणि सौरभ यांना सारखे टक्के मिळाले असले तरी त्यांना सर्व विषयांमध्ये वेगवेगळे गुण मिळाले आहेत. अर्थात त्यामध्ये फारसा फरक नाही. पण सर्व विषयांमध्ये मिळालेल्या गुणांची बेरीज ही सारखी झाली आहे. दोघांना दहावीत एकूण 433 गुण मिळाले आहेत. पुण्याच्या शुभमला सर्व विषयांत 35 मार्क दुसरीकडे यंदा दहावीत अक्युरेट 35 टक्के मार्क्स मिळवणाचा मान पुण्याच्या शुभम जाधव या नशीबवान विद्यार्थ्याला मिळालाय. तो पुण्यातील रमनबाग शाळेचा विद्यार्थी असून गंजपेठेत राहतो. केवळ योगायोग म्हणून 35 टक्के पडल्याचं तो प्रांजळपणे कबुल करतोय. शुभम जाधवला सर्वच विषयांमध्ये 35 गुण मिळाले आहेत. तो रमनबाग शाळेत शिकत होता. शुभम जाधव हा गंजपेठेमध्ये वास्तव्यास आहे आणि तो भवानी पेठेतील एका हार्डवेअरच्या दुकानात कामाला देखील जातो. तर त्याचे आई-वडील देखील मोलमजुरी करतात. शुभमला पुढे जाऊन पोलीस बनायचं आहे. त्यासाठी त्याला कॉमर्सला प्रवेश घ्यायचा आहे. दरम्यान, राज्यभरातून तब्बल 16,38,964 विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थीनींचा निकाल 97.96 असून विद्यार्थ्यांचा निकाल 96.06 आहे. यंदाच्या निकालात विद्यार्थिनींचाच डंका आहे. त्यामुळे ऑफलाईन परीक्षा होऊनही मुलीच अव्वल ठरल्या आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या