मुंबई, 26 नोव्हेंबर: नवी मुंबईतील बेलापूर (belapur) याठिकाणी 2012 साली दोन महिलांवर बलात्कार (2 women rape) केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. नरधामाने दोन महिलांवर बलात्कार केल्यानंतर, एकीची निर्घृण हत्या (one victim brutal murder) केली होती. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणातील आरोपीला ठाणे सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती. आरोपीच्या वकिलानं या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात (mumbai high court verdict) आव्हान दिलं होतं. या प्रकरणी सुनावणी केल्यानंतर, मुंबई हाय कोर्टानं मोठा निकाल दिला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने ठाणे सत्र न्यायालयाचा निर्णय रद्दबातल ठरवून आरोपीची निर्दोष सुटका केली आहे. न्यायमूर्ती साधना जाधव आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठानं हा महत्त्वाचा निकाल दिला आहे. खंडपीठाने दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर, आरोपीला संशयाचा फायदा देत त्याची सुटका केली आहे. गुरुवारी सुनावणी झाल्यानंतर उच्च न्यायलयाने हा निकाल दिला आहे. हेही वाचा- आठवीतील मुलीसोबत बापाचं घृणास्पद कृत्य; चिठ्ठी लिहून शिक्षकाकडे मागितली मदत नेमकी घटना काय? 2012 साली बेलापूरमध्ये दोन कचरा वेचक महिलांवर बलात्कार करण्यात आला होता. तसेच यातील एका पीडित महिलेची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी म्हणून रहीमुद्दीन शेख याला अटक केली होती. या प्रकरणी सुनावणी केल्यानंतर ठाणे सत्र न्यायालयानं मे 2017 साली आरोपीला फाशीची शिक्षा ठोठावली होती. पण शेख याने या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. या याचिकेवर सुनावणी केल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने संशयित आरोपीच्या बाजूने निकाल दिला आहे. हेही वाचा- सुट्टीच्या दिवशी चुकून क्लासला गेली अन्..; शिक्षकानं मुलीला दिली आयुष्यभराची जखम आरोपीनं दोन महिलांवर बलात्कार करून एकीची हत्या केली. तर दुसऱ्या महिलेला गंभीर जखमी केलं, असा आरोप सरकारी वकिलांनी केला होता. मात्र, सरकारी वकील आरोपीची गुन्ह्यातील भूमिका सिद्ध करू शकले नाहीत. आरोपी विरोधात कोणताही ठोस पुरावा न्यायालयात सादर करता न आल्यानं न्यायालयाने संशयाचा फायदा देत शेख याची निर्दोष सुटका केली. तसेच त्याच्यावरील सर्व आरोप देखील हटवण्याचे आदेश दिले आहेत.