JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / अविनाश भोसलेंचा आणखी एक पराक्रम, सरकारने दिली सवलत अन् घेतला 103 कोटींचा फ्लॅट!

अविनाश भोसलेंचा आणखी एक पराक्रम, सरकारने दिली सवलत अन् घेतला 103 कोटींचा फ्लॅट!

राज्य सरकारने जाहीर केलेल्या मुद्रांक शुल्क सवलतीचा लाभ घेऊन हा फ्लॅट खरेदी केल्याचे समोर आले आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 15 जून: पुण्यातील बिल्डर आणि हॉटेल व्यावसायिक अविनाश भोसले (Pune Builder Avinash Bhosale) यांनी दक्षिण मुंबईतील नेपियन सी रोडवर (Napian Sea Road in South Mumbai) एक डुप्लेक्स फ्लॅट खरेदी केल्याची बाबसमोर आली आहे. राज्य सरकारने जाहीर केलेल्या मुद्रांक शुल्क सवलतीचा लाभ घेऊन हा फ्लॅट खरेदी केल्याचे समोर आले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून अविनाश भोसले यांची ईडीकडून चौकशी सुरू आहे. त्यातच आता अविनाश भोसले यांचा आणखी पराक्रम समोर आला आहे.  दक्षिण मुंबईमध्ये अविनाश भोसले यांच्या एबीज्स रिअलकॉन एलएलपी या कंपनीने मुंबईत 103 कोटी 80 लाख रुपये किंमतीचा आलिशान फ्लॅट खरेदी केला आहे. 31 मार्च रोजी हा व्यवहार पूर्ण झाला आहे, असं वृत्त दैनिक महाराष्ट्र टाइम्स ने दिले आहे. महिला आमदाराची दादागिरी; भाच्याची गाडी अडवल्यानं पोलिसाच्या कानशिलात लगावली नेपियन सी रोडवर सेसन टॉवर आहे. या टॉवरमध्ये 53 आणि 54 व्या मजल्यावर हा डुप्लेक्स फ्लॅट खरेदी करण्यात आला आहे. तब्बल 7118 चौरस फूट इतका मोठा हा फ्लॅट आहे. या फ्लॅटची किंमत तब्बल 103 कोटी 80 लाख इतकी आहे. या फ्लॅटच्या खरेदीसाठी 3 कोटी ४० लाख रुपये मुद्रांक शुल्क भरण्यात आले आहे. विशेष म्हणजे, राज्य सरकारने मुद्रांक शुल्क सवलत जाहीर केली होती. जानेवारी ते मार्च 2021 या काळात मुद्रांक शुल्क 5 टक्क्यांवरून 3 टक्के करण्यात आले होते. एवढंच नाहीतर व्यवहाराची नोंदणी नंतर करण्यास सरकारने परवानगी सुद्धा दिली होती. याच संधीचा फायदा घेत अविनाश भोसले यांनी आलिशान फ्लॅट खरेदी केला. कोरोनाच्या डेल्टा व्हेरियंटविरोधात अधिक प्रभावी ठरतीये ‘ही’ लस; मृत्यूदरातही घट सेसन टॉवरमध्ये आणखी एक मोठा व्यवहार झाला आहे. एस.एम डायकेम कंपनीने 51 आणि 52 मजल्यावर 103 कोटी 65 लाखात फ्लॅट खरेदी केला आहे. मे महिन्यात याची नोंदणी झाली आहे. काही दिवसांपूर्वीच मलबार हिलमध्ये डी मार्टचे संस्थापक राधाकिशन दमानी यांनी 1001 कोटीमध्ये बंगला खरेदी केला होता. त्यानंतर आता मुंबईत कोट्यवधी फ्लॅट खरेदी करण्याची शर्यतच लागली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या