मुंबई, 22 जुलै: कल्याण डोंबिवली **(Kalyan Dombivli )**परिसरातही पावसानं (Heavy Rain) धुमाकूळ घातला आहे. अशातच कल्याण डोंबिवलीत महानगरपालिकेतील (KDMC) रेतीबंदर परिसरात अचानक पाण्याची पातळी वाढली. त्यामुळे रात्री दोनच्या सुमारास तात्काळ तबेले मालकांनी आपल्या तबल्यातील म्हशी रस्त्यावर आणल्या. सध्या किमान 1000 ते 1200 म्हशी रस्त्यावर आहेत. त्यावर रस्त्यावर म्हशीच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसत आहेत.
अचानक खाडीतील पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच कचौरे कोळीवाडा येथील सागरदेवी मंदिर आणि शेड 10 फूट पाण्याखाली गेले आहे. हेही वाचा- Breaking News: परमबीर सिंह यांच्याविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल ठाणे जिल्ह्यातील भिवंडी, बदलापूर, कल्याण, उल्हासनगर परिसरात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. मुसळधार पावसामुळे आता उल्हास नदीने सुद्धा धोक्याची पातळी ओलांडली आहे. याचा परिणाम म्हणजे नदी पात्राच्या परिसरात असलेल्या सर्व परिसरात पाणीच पाणी झाले असून सोसायट्या सुद्या पाण्याखाली गेल्या आहेत.