JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / Ashish Shelar : सिनेमात जॉनी लिव्हर यांच्या एवढाच संजय राऊतांचा रोल, आशिष शेलारांनी उडवली खिल्ली

Ashish Shelar : सिनेमात जॉनी लिव्हर यांच्या एवढाच संजय राऊतांचा रोल, आशिष शेलारांनी उडवली खिल्ली

सिनेमातील जॉनी लिव्हर यांच्या एवढा रोल संजय राऊत यांचा आहे. जॉनी लिव्हर यांच्याबद्दल मला प्रेम आणि आदर आहे. अशी भाषेत अशिष शेलारांनी राऊतांवर टीका केली आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 07 जानेवारी : मुंबई मोठे आणि छोटे नाल्यांची सफाई लवकर होत नसल्याचे दिसून येत आहे. दरम्यान याप्रकरणी आमदार आशिष शेलार यांनी मुंबई महापालिकेला पत्र लिहून निविद काढण्याची मागणी केली आहे. मुंबईतील मोठ्या नाल्यांच्या साफसफाईच्या कामाच्या निविदा अद्याप काढण्यात न आल्याने गतवर्षी प्रमाणेच कामांना विलंब होणार का? या संदर्भात पालिका आयुक्तांना पत्र लिहून तातडीने लक्ष देण्याची मागणी आशिष शेलार यांनी केली आहे. याप्रकरणी शेलार यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

ते पुढे म्हणाले की, मुंबईत 309 च्या वर मोठे नाले आहेत तर 508 छोटे नाले आहेत याचबरोबर 5 नद्या आहेत परंतु यांच्या साफसाईच्या निविद वेळेत निघाल्या नाहीत तर सफाईच्या कामाला उशीर होतो. ही दिरंगाई मुंबई करांच्या जिवाशी बेतते त्यामुळे एक स्पेशल टीम लावा असे पत्र मी आयुक्तांना लिहिले असल्याची माहिती शेलारांनी दिली.  

हे ही वाचा :  आमदार योगेश कदम यांच्या गाडीला कशेडी घाटात अपघात; टँकरने मागून धडक दिली अन्..

संबंधित बातम्या

मुंबईतील प्रत्येक भागाचे सुशोभिकरण झाले पाहिजे हे आमचे मत आहे. मागच्या 25 वर्षात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला वेळ मिळाला नाही. संपूर्ण मुंबईला पुतना मावशीचे प्रेम आहे का? आम्ही मुंबईकरांचे सेवक आहोत त्यामुळे काम करून घेणे ही आमची जबाबदारी आहे. नाल्यावर आम्ही करडी नजर ठेवू असेही ते म्हणाले.

जाहिरात

हे ही वाचा :  ‘हे सरकार फेब्रुवारी महिना सुद्धा पाहणार नाही’, संजय राऊतांचं नव भाकित

शेलारांची राऊतांवर टीका

संजयर राऊत हे सामना कार्यालयात संविधान लिहीत असतील यामुळे ते काहीही बरळत असतात. तसेच मीडियासमोर येऊन रोज पुड्या सोडणे आणि टीव्हीवर प्रेस घेणे हे संजय राऊत यांचे काम आहे. सिनेमातील जॉनी लिव्हर यांच्या एवढा रोल संजय राऊत यांचा आहे. जॉनी लिव्हर यांच्याबद्दल मला प्रेम आणि आदर आहे. पण त्यांच्या सिनेमातील रोल एवढाच संजय राऊत यांचा रोल आहे. अशा शब्दात शेलार यांनी संजय राऊत यांचा समाचार घेतला.

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या