JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / मुंबई झपाट्याने बुडतेय! अंदाजाच्या कित्येक वर्षे आधीच पाण्याखाली जाणार? नव्या अभ्यासात धक्कादायक खुलासा

मुंबई झपाट्याने बुडतेय! अंदाजाच्या कित्येक वर्षे आधीच पाण्याखाली जाणार? नव्या अभ्यासात धक्कादायक खुलासा

मुंबईच्या समुद्रतळापासून 10 मीटरपेक्षा कमी उंची असणाऱ्या सुमारे 46 वर्ग किलोमीटर भागापैकी 19 वर्ग किलोमीटर भाग हा दरवर्षी सुमारे 8.45 मिमी वेगाने बुडत आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 13 जून : देशाची आर्थिक राजधानी असलेलं मुंबई शहर येत्या काही वर्षांमध्ये पाण्याखाली (Mumbai to be drowned) जाणार असा दावा यापूर्वी कित्येक आंतरराष्ट्रीय रिसर्चमध्ये करण्यात आला आहे. मात्र, एका नव्या अभ्यासानुसार मुंबई शहर वर्षाला 2 मिलीमीटर समुद्राच्या पाण्याखाली (Mumbai Sinking speed) जात आहे. तसंच, मुंबईचा 19 वर्ग किलोमीटरचा एक भाग तर तब्बल 8.45 मिमी प्रतिवर्ष या वेगाने बुडत आहे. हिंदुस्थान टाईम्सने याबाबतचं वृत्त दिलं आहे. तर, आयआयटी बॉम्बेने केलेल्या एका स्टडीनुसार, मुंबई शहर हे दरवर्षी दोन नव्हे, तर 28.8 मिमी समुद्राच्या पाण्याखाली जात आहे. जिओफिजिकल रिसर्च लॅटर जर्नलमध्ये मार्च महिन्यात याबाबतचा रिसर्च छापून आला आहे. जगभरातील 99 देशांच्या 2016 ते 2020 या कालावधीतील सॅटेलाईट डेटाचं InSAR पद्धतीने अध्ययन करून हा रिसर्च (Research on Mumbai Sinking) प्रसिद्ध केला आहे. अमेरिकेतील युनिवर्सिटी ऑफ रॉड आयलँडच्या वैज्ञानिकांनी याबाबत संशोधन केलं. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, चीनमधील तियानजिन शहर हे सर्वांत वेगाने (Fastest Sinking city in world) पाण्याखाली जात आहे. हे शहर वर्षाला 5.2 सेंटिमीटर बुडत आहे. यासोबतच, इंडोनेशियातील सेमारंग (वर्षाला 3.9 सेमी) आणि जकार्ता (वर्षाला 3.44 सेमी), चीनमधील शांघाय (वर्षाला 2.94 सेमी), व्हिएतनाममधील हो ची मिन्ह (वर्षाला 2.81) आणि हनोई (वर्षाला 2.44 सेमी) ही शहरंदेखील वेगाने (Fastest Sinking Cities) समुद्राच्या पाण्याखाली जात आहेत. Maharashtra Rain Update : महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुढचे 5 दिवस मुसळधार पाऊस, हवामान खात्याकडून अलर्ट मुंबईतील काही भाग बुडतोय अधिक वेगाने या अभ्यासात दिलेल्या माहितीनुसार, मुंबईच्या समुद्रतळापासून 10 मीटरपेक्षा कमी उंची असणाऱ्या सुमारे 46 वर्ग किलोमीटर भागापैकी 19 वर्ग किलोमीटर भाग हा दरवर्षी सुमारे 8.45 मिमी वेगाने बुडत आहे. जगातील इतर शहरांच्या तुलनेत मुंबईचा बुडण्याचा वेग (Mumbai Sinking speed) हा बराच कमी असला; तरी समुद्राची वाढती पातळी आणि भरपूर पाऊस यामुळे हा वेग वाढूही शकतो. ग्लोबल वॉर्मिंगमुळे अरबी समुद्राच्या पाण्याची पातळी (Arabian Sea water level) वर्षाला 0.5 ते 3 मिमी वाढत आहे. म्हणजेच, मुंबईचा बुडण्याचा वेग (Mumbai Sinking 2 mm per year) हा त्यापेक्षा अधिक आहे. यामुळे मुंबईसमोर दुहेरी संकट आहे, असं या अभ्यासात म्हटलं आहे. जमीन होत आहे कमी मुंबई बुडण्याला केवळ समुद्राच्या पातळीत होणारी वाढच नाही, तर जमीन कमी होणंही (Land Subsidence) कारणीभूत आहे. ही एक भूगर्भीय प्रक्रिया आहे, ज्यामध्ये जमीनीच्या खालील भूभाग झिजून कमी होत जातो. मोठ्या प्रमाणात भूजल उपसा, माती खणणं, नैसर्गिक दलदल, मोठ्या प्रमाणातील इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स अशा बऱ्याच कारणांमुळे ही झीज होते. यावर काही ठोस उपाय नसला, तरी त्याचा परिणाम कमी केला जाऊ शकतो. यासाठी मुंबईत पूरपरिस्थिती निर्माण न होऊ देणं (Flood in Mumbai) हा एक उपाय आहे, असे तज्ज्ञांनी सांगितलं आहे. मान्सून येताच मुंबईत पाणी-पाणी, सोसाट्याचा वारा आणि पावसामुळे राज्यात अपघात, दोघांचा मृत्यू आयआयटी बॉम्बेच्या अभ्यासाने टेन्शन वाढलं अमेरिकेतील संशोधनाव्यतिरिक्त, आयआयटी बॉम्बेने (IIT Bombay) केलेलं एक संशोधनही धक्कादायक आहे. या संशोधन अहवालात दिलेल्या माहितीनुसार, मुंबई दरवर्षी 28.8 मिलीमीटर वेगाने पाण्याखाली जात आहे. काही भागांमध्ये हाच वेग तब्बल 93 मिलीमीटर प्रतिवर्ष आहे. भायखळा, कुलाबा, चर्चगेट, कालबा देवी, कुर्ला, अंधेरी पूर्व, मुलुंड, नाहूर पूर्व, दादर, वडाळा आणि ताडदेव, भांडूप, ट्रॉम्बे आणि गोवंडीतील काही भागांना सर्वाधिक धोका असल्याचं या रिसर्चमध्ये म्हटलं आहे. अर्थात, या अभ्यासाचे समांतर पुनरावलोकन करणं अद्याप बाकी आहे. 38 टक्के मुंबईला पुराचा धोका आयआयटी बॉम्बेने केलेल्या रिसर्चच्या मुख्य लेखिका सुधा राणी यांनी दिलेल्या माहितीनुसार, भरती आल्यानंतर समुद्राचा स्तर 1 ते 1.2 मीटरने वाढण्याची शक्यता आहे. अशात मुंबईतील 38 टक्के भागात थोड्याशा पावसानेदेखील पूरग्रस्त होऊ शकतो. ही बाब गंभीर असून त्यावर त्वरित पावलं उचलणं गरजेचं आहे. एकूणच, मुंबई सध्या दुहेरी संकटाला तोंड देते आहे. यावर त्वरित उपाययोजना न केल्यास, आधी केलेल्या अंदाजाच्या कित्येक वर्षं आधीच हे शहर पाण्याखाली जाण्याची भीती आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या