JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / Anil Parab: मंत्री अनिल परब आज ईडी कार्यालयात चौकशीसाठी उपस्थित राहणार नाहीत - सूत्रांची माहिती

Anil Parab: मंत्री अनिल परब आज ईडी कार्यालयात चौकशीसाठी उपस्थित राहणार नाहीत - सूत्रांची माहिती

Anil Parab: दापोलीतील रिसॉर्ट प्रकरणात चौकशीसाठी राज्याचे परिहवनमंत्री अनिल परब यांना ईडीने (Ed) नोटीस बजावली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 15 जून : शिवसेनेचे नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांना ईडीने समन्स बजावला आहे. ईडीने अनिल परब यांना दुसऱ्यांदा चौकशीसाठी बोलावले (Ed summons to Anil Parab) आहे. अनिल परब यांनी दापोलीत अनधिकृत रिसॉर्ट बांधल्याचा आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्यांनी (Kirit Somaiya) केला आहे. या रिसॉर्ट प्रकरणात काही दिवसांपूर्वी अनिल परब यांच्या शासकीय निवासस्थानी ईडीकडून धाडसत्र हाती घेण्यात आलं होतं. त्यानंतर आता अनिल परबांना ईडीने चौकशीसाठी बोलावले आहे. या प्रकरणात आता एक नवी अपडेट समोर आली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणात आज परिवहन मंत्री अनिल परब यांना चौकशीसाठी ईडीने नोटीस बजावली आहे. मात्र अनिल परब हे ईडीच्या कार्यालयात आज चौकशीसाठी उपस्थित राहणार नाहीयेत अशी माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अनिल परब हे मुंबईबाहेर असल्याने ते चौकशीसाठी ईडी कार्यालयात उपस्थित राहणार नाहीयेत. मुरुड ग्रामपंचायतीतून ED च्या हाती महत्त्वाची कागदपत्रे वादग्रस्त साई रिसॉर्ट प्रकरणाच्या संबंधित कागदपत्रे आता ईडीने ताब्यात घेतल्याची माहिती काही दिवसांपूर्वी समोर आली होती. 26 जून 2019 ला अनिल परब यांनी साई रिसॉर्ट कर भरल्याची मूळप्रत ईडीच्या हाती लागलीय. त्यामुळे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. मुरुड ग्रामपंचायतमध्ये अनिल दत्तात्रय परब यांच्या नावाने 46 हजार 800 रुपये कर भरल्याचा पुरावा हाती लागला आहे. त्यामुळे परब यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. वाचा :  परिवहन मंत्री अनिल परब यांच्या घरावर ईडीची धाड अनिल परब यांनी साई रिसॉर्टशी आपला काहीही संबंध नाही अशा स्वरुपाचे वक्तव्य वारंवार केलं होतं. मात्र आता चक्क ईडीच्या हाती मूळ कागदपत्रे लागल्याने अनिल परब यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. साई रिसॉर्ट प्रकरणात सोमय्यांचा आरोप काय? साई रिसॉर्ट हा बेकादयेशीर आहे. तसेच या रिसॉर्टच्या बांधकामात काळ्या पैशांचा वापर करण्याचा आरोपही सोमय्यांनी केला आहे. मार्च 2022 महिन्यात दापोली कोर्टात भारत सरकारने अनिल परब यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी याचिका करण्यात आली. भारत सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाने हा रिसॉर्ट बेकायदेशीर असल्याने 31 जानेवारी 2022 रोजी हा रिसॉर्ट 90 दिवसांत तोडण्याचे आदेश दिले. भारत सरकारने 17 डिसेंबर 2021 रोजी या रिसॉर्टला कराणे दाखवा नोटीस बजावली. या रिसॉर्टची बिनशेती (NA) आदेश फोर्जरी / फसवणूक करुन मिळवण्यात आला होता म्हणून रद्द करण्यात आला. 12 मार्च 2021 रोजी रिसॉर्टचे उद्घाटन करण्यात आले. 30 डिसेंबर 2020 रोजी रिसॉर्ट आणि सदर जागा अनिल परबने सदानंद कदमला 1.10 कोटी रुपयांत विकली आणि करार शेतजमिन म्हणून केले. मार्च 2020 मध्ये रिसॉर्टसाठी महावितरणकडे व्यावसायिक वीज जोडणीसाठी अर्ज केला. डिसेंबर 2020 मध्ये 2020-21 या वर्षांचे घरपट्टी / कर अनिल परबांनी ग्रामपंचायतीला भरणा केला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या