JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / Anil Deshmukh : परमबीर सिंगांचा फुसका 'बार', कोर्टात झाली पोलखोल, देशमुखांचे वकील म्हणाले...

Anil Deshmukh : परमबीर सिंगांचा फुसका 'बार', कोर्टात झाली पोलखोल, देशमुखांचे वकील म्हणाले...

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी वसुलीचा लेटरबॉम्ब टाकून एकच खळबळ उडवून दिली होती.

जाहिरात

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी वसुलीचा लेटरबॉम्ब टाकून एकच खळबळ उडवून दिली होती.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 12 डिसेंबर : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी वसुलीचा लेटरबॉम्ब टाकून एकच खळबळ उडवून दिली होती. पण, परमबीर यांनी केलेल्या आरोपांमध्ये कोणतेही तथ्य आढळून आले नाही. सर्व आरोप हे बेछुट होते, कोणत्याही बारमालकाने पैसे मागितलं नसल्याचे सांगितले आहे, असा खुलासा अनिल देशमुख यांच्या वकिलांनी केला आहे. 100 कोटी वसुली प्रकरणामध्ये अखेर अनिल देशमुख यांना जामीन मंजूर झाला आहे. देशमुख यांच्याविरोधात पुरावे नसल्याची मत कोर्टाने नोंदवलं आहे. 1 लाखांच्या जातमुचलक्यावर हा जामीन मंजूर केला आहे. देशमुख यांना जामीन हा सीबीआयला धक्का आहे. पण, त्याही पेक्षा परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपातून हवा निघाली आहे. (शाईफेकीचं समर्थन नाही, मात्र चंद्रकांतदादांना… खडसेंनी पुन्हा डिवचलं) या प्रकरणातील माफीचे साक्षीदार सचिन वाझे याने वेळोवेळी जबाब बदलले. वेगवेगळ्या संस्थाकडे वेगवेळी विधान केली आहे. तसंच मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुंबईतील बारमालकांकडून वसुली करण्याचा आरोप केला होता. पण, कोणत्याही बारमालकाने आपल्याकडे पैसे मागितले नसल्याचं कोर्टात सांगितलं आहे. असं असताना सुद्धा एक वर्षानंतर म्हणजे एप्रिल 2022 मध्ये देशमुख यांना अटक करण्यात आली होती. ही अटक बेकायदेशीर होती, कायद्याला धरून नव्हती. कोर्टामध्ये याबद्दल आम्ही युक्तिवाद केला, असा खुलासा अनिल देशमुख यांच्या वकिलांनी केला. तसंच, या प्रकरणातील आरोपी सचिन वाझेनी दिलेला जबाब विश्वासहार्य नाही, अनिल देशमुख यांचा वाढतं वय, त्यांना असलेले आजार, सुनावणी दरम्यान अनेक वेळा ते चक्कर येऊन पडले. हे सर्व लक्षात त्यांना जामीन देण्यात यावा अशीही विनंती कोर्टाला केली आहे. ईडीकडे दाखल गुन्ह्यात अनिल देशमुख यांना आधीच जामीन मिळाला आहे. अखेर आज हायकोर्टाने अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जाला मंजुरी दिली आहे. अनिल देशमुख यांना जामीन मिळाल्यामुळे सीबीआयला मोठा धक्का बसला आहे. सीबीआयने या प्रकरणी सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेणार आहे. यासाठी 10 दिवसांचा अवधी मागितला आहे. कोर्टाने सीबीआयची ही मागणी मान्य केली आहे. जामिनावर स्थगिती दिली आहे. त्यामुळे 10 दिवस देशमुख यांना जेलमध्येच थांबावे लागणार आहे. ( शिवरायांबद्दल राज्यपालांकडून माफी नाहीच! अमित शहांना पत्र लिहून दिले स्पष्टीकरण ) नेमकं प्रकरण काय? मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं होतं. या पत्रात त्यांनी गंभीर आरोप केले होते. या पत्रात त्यांनी अनिल देशमुखांनी दर महिन्याला 100 कोटी रुपये जमा करायला सांगितले होते, असा आरोप केला होता. निलंबित सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना अनिल देशमुख त्यांच्या ज्ञानेश्वर या निवासस्थानी बोलावलं आणि 100 कोटी जमा करण्यास सांगितलं होतं. मुंबईतील वेगवेगळ्या पब आणि बार मालकांकडूनही वसुली केली जाणार असल्याचा दावाही परमबीर सिंग यांनी केला होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या