JOIN US
मराठी बातम्या / मुंबई / Sachin Vaze मुंबई पोलिसांच्या ताब्यात आल्याचा मुहूर्त साधला? Anil Deshmukh यांच्या टायमिंगवर भाजपचा सवाल

Sachin Vaze मुंबई पोलिसांच्या ताब्यात आल्याचा मुहूर्त साधला? Anil Deshmukh यांच्या टायमिंगवर भाजपचा सवाल

BJP reaction after Anil Deshmukh arrest by ed: राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अटक झाल्यावर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया देत एक शक्यता व्यक्त केली आहे.

जाहिरात

अनिल देशमुखांसोबत इतरही आरोपी सचिन वाझे, कुंदन शिंदे आणि संजीव पालांडे यांनाही न्यायालयीन कोठडी सुनावली

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 2 नोव्हेंबर : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना ईडीने (ED) अटक केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून गायब असलेले अनिल देशमुख काल सकाळच्या सुमारास अचानक ईडी कार्यालयात दाखल झाले. त्यानंतर ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्यांची चौकशी केली आणि रात्री उशीरा अटक केली. मात्र, अनिल देशमुख यांच्या ईडीसमोर हजर होण्याच्या टायमिंगवर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी सवाल उपस्थित केला आहे. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं, “अनिल देशमुख हे नेहमी पोलिसांसोबत किंवा जनतेसोबत संवाद साधताना म्हणायचे की, पोलिसांनी एखादा खोटा गुन्हा दाखल केला तर त्यासंदर्भात आपली बाजू मांडलीच पाहिजे. कायदा तुमच्याबाजुने उभा आहे. मग जे वाक्य अनिल देशमुख दुसऱ्यांना सांगायचे… आज अचानक असं काय झालं? याचे दोनच कारणं असू शकतात. एक म्हणजे अनिल देशमुखांच्या लक्षात आलं की, न्यायालयाकडून आपल्याला अटकपूर्व जामीन मिळू शकत नाही. दुसरा मुद्दा, संपत्तीवर टाच येत आहे. तिसरा मुद्दा असा आहे की, सचिन वाझे महाराष्ट्राच्या एसआयटीकडे सुपूर्त झाला आहे. कदाचित अनिल देशमुखांना वाटत असेल की, आता सचिन वाझे आपण सांगून त्याप्रमाणे एसआयटी त्याच्याकडून वदवून घेईल आणि म्हणून आता मी ईडीसमोर गेलो तर धोका नाही हे असण्याची शक्यता आहे.” वाचा :  ‘काहीजण दिवाळीनंतर बॉम्ब फोडणार आहेत, आवाज येऊ द्या पण धूर काढू नका’ मुख्यमंत्र्यांचा फडणवीसांना टोला 100 कोटी वसुली आणि मनी लाँड्रिंग प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री (Former Home Minister) अनिल देशमुख (Anil Deshmukh arrest) यांना ईडीने अटक केली आहे. 13 तासांच्या चौकशीनंतर ईडीने अटकेची कारवाई केली आहे. या कारवाईमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. 100 कोटी वसुलीप्रकरणी (Money laundering case) आरोप असलेले अनिल देशमुख अनेक दिवसांपासून गायब होते. अनिल देशमुख यांना 4 ते 5 वेळा समन्स बजावल्यानंतरही ईडीसमोर हजर राहिले नव्हते. त्यामुळे त्यांना त्यांच्या नावानं लूक आऊट सर्क्युलर जारी करण्यात आलं होतं. तसंच देशमुख यांचा शोध घेण्यासाठी ईडीकडून सीबीआयकडे मदत मागण्यात आली होती. अखेर 1 नोव्हेबर रोजी अनिल देशमुख ईडी कार्यालयात हजर झाले. सकाळी 11 वाजेच्या सुमारास अनिल देशमुख ईडी कार्यालयात पोहोचले होते. देशमुखांनंतर आता ‘या’ बड्या मंत्र्याचा नंबर, किरीट सोमय्यांचा दावा अनिल देशमुखांच्या अटकेनंतर भाजपच्या नेत्यांकडून पुढील कारवाई कुणावर होणार याबाबत विविध प्रतिक्रिया येत आहे. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी देखील अनिल देशमुखांच्या अटकेबाबत तिखट प्रतिक्रिया दिली आहे. ‘अखेर ठाकरे सरकारचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीने अटक केली. 100 कोटींहून अधिक गैर-पारदर्शक व्यवहार. अनिल देशमुख नंतर अनिल परब’, अशी कॅप्शन देत सोमय्या यांनी एक ट्वीट केलं आहे. ज्यामध्ये त्यांनी एक व्हिडीओ पोस्ट करत महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, आता या अटकेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे टेन्शन वाढेल. त्यांनी असाही आरोप केला आहे की दरमहा 100 कोटीची वसुली व्हायची त्यातील पवार यांच्याकडे किती आणि ठाकरे सरकारकडे किती पैसे जायचे याचे उत्तर द्यावे लागणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या