संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांचा खोटेपणा पुन्हा एकदा उघड झाली, असा टोला किरीट सोमय्यांनी लगावला
मुंबई,०७ जुलै - शिवसेनेचे खासदार संजय राऊत (sanjay raut) आणि भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्यामध्ये पेटलेल्या आरोप युद्धाला आता पूर्णविराम मिळाला आहे. संजय राऊतांच्या आरोपांमुळे जितेंद्र नवलानी ( jitendra Navlani ) प्रकरणाची चौकशी आता मुंबई पोलिसांनी बरखास्त केली आहे. हायकोर्टाने तसे आदेश दिले आहे. संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांचा खोटेपणा पुन्हा एकदा उघड झाली, असा टोला किरीट सोमय्यांनी लगावला. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपचे नेते किरीट सोमय्या आणि ईडीवर गंभीर आरोप केले होते. पण आता संजय राऊत यांनी उद्योजक जितेंद्र नवलानी यांच्यामार्फत बिल्डरांकडून पैसे उकळल्याच्या अंमलबजावणी संचालनालयाच्या अधिकाऱ्यांवर (ed) केलेल्या आरोपांच्या चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेले विशेष तपास पथक (एसआयटी) मुंबई पोलिसांनी बरखास्त केल्याची माहिती बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाला देण्यात आली. याा निर्णयामुळे किरीट सोमय्यांना मोठा दिलासा मानला जात आहे. जितेंद्र नवलानी प्रकरणामुळे किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा अडचणीत सापडले होते. पण आता नवलानी प्रकरण बरखास्त केल्यामुळे सोमय्यांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.
किरीट सोमय्यांनी ट्वीट करून संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांचा आणखी आरोप हा खोटा ठरला आहे. संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदी यांनाही पत्र लिहिले होते. पण, आता हे आरोप सगळे खोटे ठरले आहे, असा टोला सोमय्यांनी राऊतांना लगावला. कोण आहेत नवलानी आणि काय आहे प्रकरण? खासदार संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेवून जितेंद्र नवलानी नावाची एक व्यक्ती आहे जी व्यक्ती ईडीच्या अधिकाऱ्यांसोबत मिळून अनेक कंपन्यांकडून खंडणी वसूल करते असा आरोप केला होता. या आरोपानंतर कट्टर शिवसैनिक अरविंद भोसले यांनी मुंबई पोलीस आयुक्त यांच्या नावे एक तक्रार दिली होती. ८ मार्च २०२१ या दिवशी ही तक्रार दिली होती. या तक्रारारीच्या १ वर्षानंतर म्हणजे २२ मार्च या दिवशी मुंबई पोलिसांनी या तक्रारीच्या आधारावर जितेंद्र नवलानी संबंधीत ५ कंपन्यांना आणि ज्या कंपन्यांनी जितेंद्र नवलानी यांच्याशी संशयास्पद व्यवहार केलाय आहेत अशा कंपन्यांना आर्थिक गुन्हे शाखेने नोटीस बजावल्या आहेत. ( VIDEO : रस्ते अपघातामध्ये जखमी झालेल्या वारकऱ्यांच्या मदतीसाठी धावले ‘एकनाथ’ ) तक्रारदार अरविंद भोसले यांनी आरोप केलाय की, ‘जितेंद्र नवलानी हे एका ईडीच्या अधिकाऱ्यांसोबत मिळून अनेक कंपन्यांना ईडी कारवाई पासून वाचवण्यासाठी त्यांच्याकडून लाखो रुपये नवलानी मार्फत घेतल्याचा आरोप केला. या तक्रारीत अरविंद भोसले यांनी जितेंद्र नवलानी यांच्या पुढील ५ कंपन्यांची नावे दिली आहेत. बिलेनिअर हाॅस्पिटल सर्व्हिस प्रायव्हेट लिमिडेट, बोनांझा फॅशन मर्चंट, प्रोंटो एंटरटेंमेंट प्रायव्हेट लिमिटेड, सिक्युरीओ सिस्टम प्रायव्हेट लिमिटेड आणि ट्रिस्ट हाॅस्पिटॅलिटी सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड या त्या ५ कंपण्या आहेत तर या ५ कंपण्यांच्या खात्यात 41 विविध कंपन्यांची ५९ कोटी रुपयांचे व्यवहार केले. हे व्यवहार करण्यामागचे कारण काय? अशी विचारणा अरविंद भोसले यांच्या तक्रारारीनंतर आर्थिक गुन्हे शाखेने त्या ४१ कंपन्यांकडे केली होती.